समजा, ट्विटरने आपल्याला पैसे देणे सुरू केले तर? वाटलेना आश्चर्य? तर, ट्विटरने काही निवडक युजर्ससोबत अॅड रेव्हेन्यू शेअर करायला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ, युजर्सना ट्विट करण्यासाठी पैसे मिळत आहेत. याचा लाभ घेण्यासाठी युजर्स अथवा क्रिएटर्सना अॅड रेव्हेन्यू शेअरिंग आणि क्रिएटर्स सब्सक्रिप्शनसाठी साइनअप करावे लागेल.
ट्विटरने म्हटले आहे की, स्ट्राइप पेमेंटचा सपोर्ट असलेल्या सर्वच देशांमध्ये क्रिएटर अॅड रेव्हेन्यू शेअरिंग उपलब्ध असेल. याचाच अर्थ असा की, भारतात युजर्ससाठी ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. मात्र, सोशल मिडिया फर्म भविष्यात त्यांच्या योजनेत बदल करण्यावर विचार करू शकते.
नुकत्याच समोर अलेल्याएका ट्विटनुसार, लोकप्रिय यूट्यूबर मिस्टर बीस्टने (जेम्स डोनाल्डसन) अॅड शेअरिंग रेव्हेन्यूच्या माध्यमाने 25,000 डॉलर म्हणजेच, जवळपास 21 लाख रुपये कमावले आहेत. याशिवाय अनेक युजर्सना नुकसान भरपाई म्हणून 5 लाखहून अधिक रुपये मिळाले आहेत. तसेच आणखी एका युजरला 3,899 डॉलर म्हणजेच 3.1 लाख रुपये मिळाले आहेत. ट्विटरने एक ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, अॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रॅम इनिशियल ग्रुपसाठी सुरू करण्यात येत आहे. ज्यांना पेमेंट स्वीकारण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल.
याशिवाय, अॅड रेव्हेन्यू शेअरिंगसाठी अर्ज प्रक्रियेकरता एक पोर्टल अथवा पेज लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. इलॉन मस्क यांनी फेब्रुवारी महिन्यात या कार्यक्रमासंदर्भात घोषणा केली होती. महत्वाचे म्हणजे, इलॉन मस्क स्वतःही अॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रॅमसाठी इलिजिबल आहेत. कारण त्यांचे प्रोफाईलदेखील व्हेरिफाईड आहे.