Lokmat Money > बिझनेस न्यूज > Home Loan Application : तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा

Home Loan Application : तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा

Home Loan Application : कमी क्रेडिट स्कोअर, अस्थिर उत्पन्न किंवा अपूर्ण कागदपत्रे यासारख्या विविध कारणांमुळे बँका गृहकर्ज देणे टाळतात. मात्र, तुम्ही आधीच तयारी करुन गेलात तर तुमचा अर्ज कधीच रद्द होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:23 PM2024-09-26T14:23:08+5:302024-09-26T14:24:05+5:30

Home Loan Application : कमी क्रेडिट स्कोअर, अस्थिर उत्पन्न किंवा अपूर्ण कागदपत्रे यासारख्या विविध कारणांमुळे बँका गृहकर्ज देणे टाळतात. मात्र, तुम्ही आधीच तयारी करुन गेलात तर तुमचा अर्ज कधीच रद्द होणार नाही.

now your home loan application will not be rejected | Home Loan Application : तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा

Home Loan Application : तुमच्या गृहकर्जाचा अर्ज कधीच होणार नाही रिजेक्ट! फाईल देण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा

Home Loan Application : मध्यमवर्गीय लोकांसाठी हक्काचं घर खरेदी करणे हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नाही. यासाठी अनेकजण आयुष्यभराची जमापुंजी लावतात. परंतु, अनेकदा कमी क्रेडिट स्कोअर, अस्थिर उत्पन्न किंवा अपूर्ण कागदपत्रे अशा विविध कारणांमुळे बँका गृहकर्ज नाकारतात. अशा परिस्थितीत घर घेणाऱ्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाते. तुम्ही देखील गृहकर्जासाठी अर्ज केल्यानंतर अपात्र ठरला असाल तर निराश होऊ नका. यासाठी काही पर्याय आणि उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची परिस्थिती सुधारू शकता.

क्रेडिट स्कोर सर्वात महत्त्वाचा
कोणत्याही बँकेत गृहकर्जासाठी अर्ज केला तर पहिला तुमचा क्रेडिट स्कोर पाहतात. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपला क्रेडिट कार्ड पाहायला विसरू नका. जर तो कमी असेल तर प्रथम तुमचा स्कोअर सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. जुन्या कर्जांची वेळेत परतफेड करा. नवीन कर्ज घेणे टाळा आणि वेळेवर बिले भरा.

NBFC चा विचार करा
जर बँकेने तुमचा अर्ज नाकारला असेल, तर नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकता. एनबीएफसी सामान्यत: अधिक लवचिक कर्ज नियमांसह काम करतात. फक्त बँकेच्या तुलनेत तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागू शकते. जर ते तुमच्या आवाक्यात असेल तर तुमचा प्रश्न मिटलाच म्हणून समजा.

सह-अर्जदार किंवा हमीदार ठेवा
तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास तुम्ही सह-अर्जदार किंवा जामीनदारासोबत अर्ज करण्याचा विचार करू शकता. यामुळे तुमचा अर्ज स्वीकारण्याची शक्यता वाढते. तुमचीही अशीच स्थिती असेल तर एखादा सहकर्जदारा आधीच तयार करुन ठेवा.

सरकारी योजना शोधा
प्रत्येकाला पक्क घर असावं यासाठी केंद्र सरकारकडून काही योजना राबवल्या जातात. या योजनेचाही फायदा तुम्ही घेऊ शकता. विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या गटांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी अनुदान देते.

Web Title: now your home loan application will not be rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.