Join us

५0 हजार कोटींचा एनपीए वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:08 AM

दिवाळीखोरी बोर्डाचे सुयश; कर्जदात्यांना ५६ टक्के रक्कम परत

नवी दिल्ली : नादारी आणि दिवाळखोरी संहितेमुळे (आयबीसी) ३२ कंपन्यांकडे थकलेले ४९,७८३ कोटींचे अनुत्पादक भांडवल (एनपीए) वसूल झाले आहे. कर्जदात्यांना दाव्यापैकी ५६ टक्के रक्कम परत मिळाली आहे.नादारी नियामकांनी दिलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. आर्थिक तणावात असलेल्या ३२ कंपन्यांवर दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जूनअखेरीस मंजुरी दिली होती. या प्रक्रियेतून ही वसुली झाली आहे. कर्जदात्या बँका व वित्तसंस्थांना आपल्या दाव्यापैकी ४४ टक्के रक्कम सोडून द्यावी लागली आहे. परंतु विश्लेषकांच्या मते आयबीसीने आधीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. आधी वसुली प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती व त्यातून फारच थोडी रक्कम बँकांच्या हाती लागत असे. या ३२ पैकी कंपन्यांपैकी ६४ टक्के थकबाकी एकट्या भूषण स्टीलची होती. या कंपनीकडून जवळपास तेवढीच रक्कम वसूल झाली आहे. आयबीसीची ही कामगिरी उत्त्तम मानली जात आहे. कार्पोरेट प्रोफेशनल कॅपिटल या संस्थेचे भागीदार व दिवाळखोरी समाधान विभागाचे प्रमुख मनोज कुमार म्हणाले की, आधीच्या व्यवस्थेत वसुलीला खूप वेळ लागूनही केवळ २0 ते ३0 टक्के रक्कमच वसूल व्हायची.एकूण वसुली ६१ टक्केभारतीय नादारी आणि दिवाळखोरी बोर्डाने जारी केलेल्या माहितीनुसार, बँकांसारख्या वित्तीय कर्जदात्यांचे (फिनान्शिअल क्रेडिटर्स) ४७,७६८ कोटी वसूल झाले आहेत.त्यांच्या दाव्याच्या तुलनेत हा आकडा ५५ टक्क्यांपेक्षा थोडा अधिक आहे. कच्चा माल पुरवठादारांसारख्या परिचालन कर्जदात्यांचे (आॅपरेटिंग क्रेडिटर्स) २,0१५ कोटी वसूल झाले आहेत. त्यामुळे एकूण वसुलीचा आकडा ६१ टक्के होतो.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र