Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता तुम्ही बोलूनही UPI व्यवहार करू शकता, NPCI कडून नवीन फीचर लाँच!

आता तुम्ही बोलूनही UPI व्यवहार करू शकता, NPCI कडून नवीन फीचर लाँच!

यूपीआय आणणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आता यूपीआयसाठी एक नवीन फीचर आणले आहे, जे अधिक प्रभावी तसेच सोपे बनवू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 11:26 AM2023-09-07T11:26:41+5:302023-09-07T11:27:19+5:30

यूपीआय आणणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आता यूपीआयसाठी एक नवीन फीचर आणले आहे, जे अधिक प्रभावी तसेच सोपे बनवू शकते.

npci announced launch of many upi products in global fintech festival including voice based hello upi | आता तुम्ही बोलूनही UPI व्यवहार करू शकता, NPCI कडून नवीन फीचर लाँच!

आता तुम्ही बोलूनही UPI व्यवहार करू शकता, NPCI कडून नवीन फीचर लाँच!

नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेसचा (UPI) वापर देशात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. यूपीआयची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देखील अनेकदा देशाच्या यूपीआय सिस्टमच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जातो. दरम्यान, यूपीआय आणणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आता यूपीआयसाठी एक नवीन फीचर आणले आहे, जे अधिक प्रभावी तसेच सोपे बनवू शकते.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बुधवारी यूपीआयवर नवीन पेमेंट ऑप्शन आणला आहे. यामध्ये बोलून म्हणजेच व्हॉइस मोडद्वारे पेमेंट करण्याची सर्व्हिस देण्यात आली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 'ग्लोबल फिनटेक फेस्ट' नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये या नवीन सर्व्हिस प्रोडक्टचे लाँचिंग केले.

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये लाँच करण्यात आलेले एक प्रोडक्ट म्हणजे 'हॅलो यूपीआय' आहे. जे अॅप्स, फोन कॉल्स आणि आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उपकरणांद्वारे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आवाजाद्वारे यूपीआय पेमेंट करण्यास सक्षम आहे. हे फीचर यूपीआयला अधिक लोकप्रिय करून गेम चेंजर ठरू शकते, असे म्हटले जाते. 'हॅलो यूपीआय'  लवकरच देशातील इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होईल. 

'हॅलो यूपीआय' हे सेगमेंटमध्ये विभागले गेले आहे, ज्या अंतर्गत यूपीआयवर Conversational Payments सह BillPay Connect ची सुविधा मिळू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, या Conversational Payments साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सक्षम व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात, ज्यामुळे देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार अधिक जलद आणि अधिक ठिकाणी करणे शक्य होईल.

क्रेडिट लाइन यूपीआय
शनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले की, यूपीआयवर 'क्रेडिट लाइन' सुविधेसह, ग्राहकांना त्याद्वारे बँकांकडून पूर्व-मंजूर कर्ज (प्री-अप्रुव्ड लोन) घेण्याची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक पूर्व-मंजूर कर्जाद्वारे यूपीआय प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकतील. याशिवाय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 'लाइट एक्स' नावाचे आणखी एक प्रोडक्ट लाँच केले आहे, याचा वापर करून रुपयाचे व्यवहार ऑफलाइन देखील करता येतील.

Web Title: npci announced launch of many upi products in global fintech festival including voice based hello upi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.