मुंबई : यूपीआय आणि रूपे कार्ड यांचा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याचा निर्णय ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’ने (एनपीसीआय) घेतला आहे. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) ही एनपीसीआयची नवी उपकंपनी जागतिक पातळीवरील व्यवसाय सांभाळणार आहे.
‘एनपीसीआय’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुपे कार्ड आणि यूपीआय यांचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे यावर उपकंपनीचा मुख्य भर राहील. जगातील अनेक देशांनी ‘रियल टाइम पेमेंट सिस्टिम’ अथवा स्वत:ची देशांतर्गत कार्ड योजना सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला आम्ही साह्य करू.
दरम्यान, ‘एनआयपीएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रितेश शुक्ला यांची नेमणूक करण्यात आली आहे. व्यावसायिक धोरणे ठरविणे, एनपीसीआयच्या पूर्वनिर्मित तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय बाजारात वापर करून नफा क्षमता वाढविणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या शुक्ला यांच्यावर असतील.
>एनआयपीएलची वृद्धी आणि उत्क्रांती ही रूपे आणि यूपीआय नेटवर्कची स्वीकारार्हता वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरेल. विदेशात प्रवास करणाºया भारतीयांना स्वदेशी पेमेंट चॅनलचा वापर करण्याची सुविधा त्यातून मिळेल. आपले मॉडेल अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील अनेक देशांनी अशीच स्वदेशी व्यवस्था निर्माण करण्यात उत्सुकता दाखविली आहे.
यूपीआय, रूपे कार्डांना एनपीसीआय नेणार जागतिक पातळीवर
एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) ही एनपीसीआयची नवी उपकंपनी जागतिक पातळीवरील व्यवसाय सांभाळणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:29 AM2020-08-21T05:29:07+5:302020-08-21T05:29:16+5:30