राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच एनपीएस (NPS) ही भारत सरकारने सुरु केलेली रिटायरमेंट (Retirement pension) बेनिफिट स्कीम आहे. याद्वारे एनपीएस अकाऊंट धारकांना निवृत्तीनंतर एक ठरावीक रक्कम दर महिन्याला देऊ करते. या योजनेला पेन्शन योजनादेखील म्हटले जाते.
टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टनुसार कमी जोखीम घेऊ इच्छिणारे व्यक्ती आपल्या एनपीएस खात्यात दर महिन्याला 12 हजार रुपये गुंतवून रिटायरमेंटनंतर दर महिन्याला 1.80 लाख रुपये पेन्शन मिळवू शकतात. म्हणजेच दिवसाला 400 रुपये. एनपीएस खातेधारक एसडब्ल्यूपी म्हणजेच सिस्टॅमेटीक विड्रॉवल प्लानचा वापर करून रिटायरमेंटनंतर आपले मासिक उत्पन्न वाढवू शकतात.
सेबी रजिस्टर टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी नुसार एनपीएस खातेधारक त्यांच्या खात्यातील 75 टक्क्यांपर्यंत इक्विटी एक्सपोजर निवडू शकतात. इक्विटी 60 आणि डेट एक्सपोजर 40 टक्के राखणे सर्वात चांगले. जे कमी जोखीम पत्करू इच्छितात त्यांच्यासाठी हे चांगले आहे. 60:40 द्वारे खातेधारकाला दीर्घ मुदतीसाठी जवळपास 10 टक्के व्याज दर मिळण्यास मदत मिळेल.
समजून घ्या गणित....
जर एखादा व्यक्ती 30 वर्षांसाठी त्याच्या एनपीएस खात्यात महिन्याला 12 हजार रुपये भरत असेल आणि शुद्ध एनपीएस मॅच्युरिटी अमाउंटचा 40 टक्के अॅन्युईटी खरेदी करत असेल तर त्याला 1.64 कोटी रुपये एकरकमी मिळतील. 54,704 रुपये मासिक मासिक पेन्शनच्या रुपात कमीतकमी 6 टक्के वार्षिक परतावा देईल. काही जणांना 40 ऐवजी 50 टक्के अॅन्युईटी खरेदी करायची असेल त्यांची मासिक पेन्शन 68 330 रुपये होईल आणि एकरकमी रक्कमही 1 कोटी 36 लाख 75 हजार एवढी मिळेल.
एसडब्ल्यूपी कसे फायद्याचे...
एनपीएस अकाऊंट होल्डर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एसडब्ल्युपी मध्ये एकरकमी राशीचा उपयोग करू शकतात. 25 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 1.36 कोटींच्या गुंतवणूकीसाठी 8 टक्के व्याजदराने 1,02,464.455 रुपये मिळवू शकतो. तसेच एनपीएस खातेधारक 40 टक्के अॅन्युईटी जोखिम पत्करून एकरकमी 1.64 कोटी रुपये मिळवू शकतो.