PFRDA नं नियमांमध्ये बदल करून नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणूकीसाठी ६५ वर्षआंपेक्षा अधिक वयानंतरही स्कीममध्ये जोडल्या जाणाऱ्या सबस्क्रायबर्ससाठी अधिक आकर्षक केलं आहे. या अंतर्गत पेन्शन इंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना या स्कीममध्ये जोडल्यानंतर त्यांना ५० टक्क्यांपर्यंत फंड इक्विटीमध्ये अलोकेशन करण्याची परवानगी देतं.
यासह, यातून बाहेर पडण्याशी संबंधित नियम देखील सुलभ केले गेले आहेत. PFRDA नं एनपीएसमध्ये सामील होण्यासाठी जास्तीत जास्त वय ६५ वर्षांवरून ७० वर्षे केल्यानंतर या योजनेतील एन्ट्री आणि एक्झिट नियमांमध्ये बदल केले आहेत. या योजनेत प्रवेशासाठी निर्धारित केलेलं वय १८ ते ६५ वर्षांवरून १८ ते ७० वर्षे करण्यात आलं आहे.
सुधारित नियमांबाबत पीएफआरडीएने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ६५ ते ७० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतातील विदेशी नागरिक एनपीएसमध्ये सामील होऊ शकतो आणि ७५ वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करू शकतो. प्राधिकरणाच्या मते, ज्या ग्राहकांनी त्यांचं खातं बंद केलं आहे ते नवीन नियमांनुसार नवीन खातंदेखील उघडू शकतात.
६५ वर्षांनंतर सामील झाल्यास काय?
जर एखादी व्यक्ती ६५ वर्षांच्या वयानंतर एनपीएसमध्ये सामील झाली, तर 'ऑटो चॉइस'च्या डीफॉल्ट मोडमध्ये जास्तीत जास्त इक्विटी एक्सपोजर फक्त १५ टक्के असेल. त्याच वेळी, असे ग्राहक हवं असल्यास पेन्शन फंड आणि असेट्स अलोकेशनमध्ये जास्तीतजास्त इक्विटी एक्सपोजरला ऑटो मोडमध्ये १५ टक्के आणि अक्टिव्ह चॉईस मोडमध्ये ५० टक्क्यांपर्यंत निवडू शकतात.
कोणत्याही एनपीएस सबस्क्रायबर कडे अॅक्टिव्ह चॉईस किंवा ऑटो चॉईसद्वारे निरनिराळ्या असेट्स क्लासमध्ये आपल्या कॉन्ट्रीब्युशनला अलोकेट करण्याचं स्वातंत्र्य असेल. कोणत्याही एनपीएस ग्राहकाकडे अॅक्टिव्ह चॉईल किंवा ऑटो चॉईसद्वारे निरनिराळ्या असेट्स क्लासमध्ये आपल्या कॉन्ट्रीब्युशनला अलोकेट करण्याचं स्वातंत्र्य असेल.