Lokmat Money > बिझनेस न्यूज > NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स

NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स

NPS Vatsalya Scheme: देशातील पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार मोठा पुढाकार घेत आहे. याअंतर्गत मुलांसाठी पेन्शन खातं उघडता येणारे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:01 AM2024-09-18T09:01:05+5:302024-09-18T09:05:39+5:30

NPS Vatsalya Scheme: देशातील पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार मोठा पुढाकार घेत आहे. याअंतर्गत मुलांसाठी पेन्शन खातं उघडता येणारे.

NPS Vatsalya Scheme you can open Children s Pension Account can invest from rs 1000 per annum Check out the details of the scheme nirmala sitharaman | NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स

NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स

NPS Vatsalya Scheme: देशातील पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार मोठा पुढाकार घेत आहे. याअंतर्गत मुलांसाठी पेन्शन खातं उघडता येणारे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (१८ सप्टेंबर २०२४) दुपारी ३ वाजता एनपीएस वात्सल्य योजनेचा (NPS Vatsalya Scheme शुभारंभ करतील. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मही सुरू करण्यात येणारे.

अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, योजनेशी संबंधित तपशील जारी करण्याबरोबरच योजनेत सामील होणाऱ्या अल्पवयीन सबस्क्रायबर्सना (Minor Subscribers) पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबरदेखील (Permanent Retirement Account Number) देण्यात येईल. एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पेन्शन खात्यात गुंतवणूक करू शकतील, जेणेकरून त्यांच्यासाठी दीर्घ काळात त्यांच्यासाठी मोठा निधी तयार होईल.

वर्षाला १ हजार रुपयांची गुंतवणूक

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एनपीएस वात्सल्य योजनेमध्ये फ्लेक्सिबल कॉन्ट्रिब्युशन आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होतील. ज्यामुळे पालक मुलाच्या नावावर वार्षिक १,००० रुपयेदेखील गुंतवू शकतील. हे सर्व आर्थिक पार्श्वभूमीच्या कुटुंबांना सोयीचं ठरणार आहे.

मुलांचं आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हे भारताच्या पेन्शन व्यवस्थेतील एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (PFRDA) अंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. 

Web Title: NPS Vatsalya Scheme you can open Children s Pension Account can invest from rs 1000 per annum Check out the details of the scheme nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.