पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ) आणि नॅशनल पेन्शन सिस्टमकडे (एनपीएस) दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीचे साधन म्हणून पाहिले जाते. पब्लिक प्रोविडेंट फंड हे एक पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूकीचे साधन मानले जात आहे. परंतु बाजारावर अवलंबून असलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टमला थोडी धोकादायक गुंतवणूक मानलं जातं. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याज ७.१ टक्के आहे. एनपीएसमध्ये जर एखाद्या व्यक्तीने इक्विटीमध्ये ६० टक्के आणि ४० टक्के डेब्टमध्ये गुंतवले असेल तर त्याला १० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.कर तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणतात, "पीपीएफवरील व्याज दर जवळपास निश्चित झाले आहेत. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी त्याचे व्याजदर जाहीर करते. पण एनपीएस रिटर्न ही बाजारपेठेशी संबंधित गुंतवणूक आहे. सरकारी नियमांनुसार कोणताही एनपीएस खातेधारक ७५ टक्के इक्विटी एक्सपोजर निवडू शकतो.ट्रान्ससेन्ड कन्सल्टिंगशी संबंधित कार्तिक झवेरी म्हणतात, “दीर्घकाळ इक्विटी गुंतवणूकीवर १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे. तर डेब्ट एक्सपोजर ८ टक्क्यांच्या जवळपास राहतो. जेव्हा एनपीएस अकाऊंटचा ६०:४० या गुणोत्तरात इक्विटी आणि डेब्टमध्ये गुंतवणूक होते, तेव्हा लाँग टर्म इक्विटी रिटर्न ७.२ टक्के आणि डेब्ट रिटर्न ३.२ टक्क्यांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.वाईटात वाईट परिस्थितीत एनपीएसवर १० टक्के व्याज मिळतं. जर तुम्ही पीपीएफमध्ये दर महिन्याला ८ हजार रुपये ३० वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला ७.१ टक्क्यांच्या व्याजासहित ९८ लाख ८८ हजार ५८३ रूपये मिळतात.
PPF vs NPS: पाहा कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवल्यास मिळेल उत्तम रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:40 AM
पब्लिक प्रोविडेंट फंड (पीपीएफ) आणि नॅशनल पेन्शन सिस्टमकडे (एनपीएस) दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीचे साधन म्हणून पाहिले जाते.
ठळक मुद्देPPF, NPS कडे दीर्ध मुदतीचं साधन म्हणून पाहिलं जातं.