Lokmat Money > बिझनेस न्यूज > टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

Share Market Update: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्ताहातील पहिला दिवस शुभ ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:20 PM2024-10-14T16:20:13+5:302024-10-14T16:21:22+5:30

Share Market Update: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्ताहातील पहिला दिवस शुभ ठरला आहे.

nse nifty closes above 25000 mark bse sensex 600 points hdfc bank tech mahindra share rally most | टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

Stock Market : गेल्या आठवड्यातील उलथापालथीनंतर या सप्ताहातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय शुभ ठरले आहे. बाजारातील ही वाढ गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे झाली, ज्याचे श्रेय बँकिंग आणि आयटी शेअर्सना द्यावे लागेल. आजच्या सत्रात सेन्सेक्स ८२००० आणि निफ्टी २५००० चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स ५९१ अंकांच्या उसळीसह ८१,९७३ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६४ अंकांच्या वाढीसह २५,१२७ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतार
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २० शेअर्स वाढीसह आणि १० शेअर्य तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३४ शेअर्स वाढीसह आणि १५ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा २.९३ टक्के, एचडीएफसी बँक २.२९ टक्के, एलअँडटी १.८९ टक्के, आयटीसी १.७८ टक्के, इंडसइंड बँक १.६३ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.५५ टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी १.८१ टक्के, टाटा स्टील १.४९ टक्के, बजाज फायनान्स १.१८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.६७ टक्के, नेस्ले ०.३९ टक्के, ॲक्सिस बँक ०.३६ टक्क्यांनी घसरले.

बँकिंग आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ 
आजच्या व्यवसायात बँकिंग आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. निफ्टीचा बँकिंग निर्देशांक १.२६ टक्के किंवा ६४४ अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी आयटी निर्देशांक ५३७ अंकांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑटो सेक्टरचे शेअर्स तेजीने बंद झाले. घसरणाऱ्या स्टॉकमध्ये धातू, माध्यमे आणि वस्तूंचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मजबूत वाढीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये वाढ
शेअर बाजारातील तेजीमुळे लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप वाढीसह बंद झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे बाजार भांडवल ४६३.७६ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील ट्रेडिंग सत्रात ४६२.२७ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title: nse nifty closes above 25000 mark bse sensex 600 points hdfc bank tech mahindra share rally most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.