Join us

NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO ला SEBI चा हिरवा कंदील; 10,000 कोटी रुपये उभारण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:19 PM

NTPC IPO: NTPC ग्रीन एनर्जीचा IPO Hyundai Motor India आणि Swiggy's IPO नंतर तिसरा सर्वात मोठा IPO असेल.

NTPC Green Energy IPO: स्टॉक मार्केट रेग्युलेटर SEBI ने NTPC ची उपकंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड च्या IPO(Initial Public Offering) ला मान्यता दिली आहे. NTPC ग्रीन एनर्जी IPO द्वारे बाजारातून 10000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती.

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी NTPC ची उपकंपनी आहे. NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO मध्ये पूर्णपणे नवीन इश्यू असेल. म्हणजेच कंपनी नवीन शेअर जारी करेल, तर प्रवर्तक कंपनी IPO मधील आपला हिस्सा विकणार नाही. 

SEBI कडे दाखल केलेल्या मसुद्यात NTPC ग्रीन एनर्जीने म्हटले की, IPO मध्ये उभारण्यात येणाऱ्या 10,000 कोटी रुपयांपैकी 7500 कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि विस्तारासाठी खर्च होईल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओमध्ये काही शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. कर्मचाऱ्यांना IPO किंमतीतही सूट दिली जाईल. NTPC भागधारकांसाठी देखील शेअर्स राखीव असतील. NTPC ग्रीन एनर्जीचे शेअर्स NSE आणि BSE वर लिस्ट केले जातील.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग