Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

NTPC IPO: सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी NTPC ने एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा IPO आणण्याची योजना आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:53 PM2021-06-30T18:53:53+5:302021-06-30T18:55:06+5:30

NTPC IPO: सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी NTPC ने एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा IPO आणण्याची योजना आणली आहे.

ntpc renewable energy plans to launch ipo to raise funds for solar and wind power projects | सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

मुंबई: कोरोनाचे संकट देशावर कायम असताना मात्र दुसरीकडे शेअर बाजाराची उच्चांकी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या आर्थिक वर्षापासून अनेकविध कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता सरकारी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी NTPC ने एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा IPO आणण्याची योजना आणली आहे. (ntpc renewable energy plans to launch ipo to raise funds for solar and wind power projects)

आपीओच्या माध्यमातून  NTPC ने २०३२ पर्यंत ६० गीगावॅटची अक्षय उर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी या माध्यमातून निधी उभा केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. एनटीपीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांनी सांगितले की, एचएलडीई अनुषंगाने आपले ऊर्जा उद्दिष्ट निश्चित करणारी एनटीपीसी देशातील पहिली ऊर्जा कंपनी आहे. 

गौतम अदानींना धक्का! संपत्तीत मोठी घट; अब्जाधीश उद्योजकांच्या यादीत घसरण

एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीची सुरुवात

निधी उभारण्यासाठी केवळ एका पर्यायाकडे लक्ष देऊन चालणार नाही. आम्ही लवकरच सार्वजनिक पातळीवर निधी जमवण्याचा विचार करीत आहोत, असे सिंग यांनी यासंदर्भात झालेल्या एका बैठकीवेळी बोलताना सांगितले. कंपनी दरवर्षी ७ ते दशलक्ष अक्षय ऊर्जा क्षमतेची भर घालणार आहे. गतवर्षी पुनरुत्पादक ऊर्जा व्यवसायासाठी पूर्णपणे स्वतंत्र मालकी असलेल्या एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे. 

गडकरींची मोठी योजना! ‘फ्लेक्स’ इंजिन तीन महिन्यांत; इंधनात ३० ते ३५ रुपयांची बचत होणार?

कोरोना काळातही नफ्यात वाढ

कोरोना संकटाच्या काळातही एनटीपीसीच्या उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीला ४ हजार ४७९ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ३ रुपये प्रति शेअरच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली होती. कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
 

Web Title: ntpc renewable energy plans to launch ipo to raise funds for solar and wind power projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.