मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चालू वर्षामध्ये विमान प्रवाशांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची
शक्यता आहे. केअर रेटिंग्ज या पतमापन संस्थेने ही शक्यता वर्तविली आहे.
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये ही घट २० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे विमान प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा येण्याची शक्यता असल्याने आगामी काळामध्ये विमान प्रवास महागण्याचे संकेतही या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहेत.
प्रारंभी काही क्षेत्रामध्ये असलेले लॉकडाउन देशव्यापी झाले आणि त्यानंतर त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळेच आमच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा नवीन अंदाजांमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे केअर रेटिंगने स्पष्ट केले आहे.
यंदा रोडावणार विमान प्रवाशांची संख्या
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चालू वर्षामध्ये विमान प्रवाशांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:54 AM2020-04-29T03:54:20+5:302020-04-29T03:54:43+5:30