मुंबई : ग्राहकांनी बँक बदलली तरी त्याचा खाते क्रमांक तोच राहायला हवा, असे सांगत, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी खाते क्रमांक पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन बँकांना केले आहे. बँकिंग सेवांसाठी वाढीव शुल्क न लावण्याचा इशाराही त्यांनी बँकांना दिला.
मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटीची सुविधा यापूर्वीच देशात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंद्रा यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. ‘बँकिंग कोडस् अॅण्ड स्टँडर्स बोर्ड आॅफ इंडिया’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुंद्रा यांनी सांगितले की, तांत्रिक प्रगती आणि बँक खात्यांची आधार जोडणी यामुळे खाते क्रमांक पोर्टेबिलिटीची सेवा उपलब्ध करून देणे अगदी सोपे आहे.
यूपीआयसारख्या अत्यंत आधुनिक पेमेंट यंत्रणा आता आल्या आहेत. त्यातच बँक खात्यांची आधार जोडणी झाली आहे. त्यामुळे खाते क्रमांक पोर्टेबिलिटी शक्य कोटीतील गोष्ट बनली आहे. भविष्यात एखादी नाराज ग्राहक महिला आपले खाते मूळ क्रमांकासह सहजपणे दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करून घेईल. इंडियन बँकर्स असोसिएशनने यावर काम करण्यास सुरुवात करायला हवी.
मुंद्रा यांनी खाते क्रमांक पोर्टेबिलिटीचा मुद्दा पहिल्यांदाच मांडलेला नाही. याआधी फेब्रुवारी २0१६मध्ये त्यांनी मिंटतर्फे आयोजित वार्षिक बँकिंग परिषदेत बीजभाषण करताना हाच मुद्दा मांडला होता. बँक खाते क्रमांकाची पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिल्यास बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेला नवा आयाम मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.
बँकांची निर्णयाविषयी नाराजी
खाते क्रमांक पोर्टेबिलिटीचा मुद्दा बँकांना मात्र पटलेला नाही. हा निर्णय झालाच तर त्याची अंमलबजावणी हा बँकांसाठी चिंतेचा विषय राहील, असे त्यांना वाटते. देशातील बँकांच्या खाते क्रमांकात समानता नाही.
आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांक १२ अंकी आहे. सिटी बँकेचा १0 अंकी, तर एचडीएफसी बँकेचा १४ अंकी आहे. या परिस्थितीत क्रमांक पोर्टेबिलिटीच्या मार्गातील मुख्य अडथळा आहे, असे बँकांचे म्हणणे आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि परिचालन अधिकारी नीरज व्यास यांनी सांगितले की, सगळ्या बँकांचे क्रमांक समान आकड्यांचे असणे पोर्टेबिलिटीसाठी आवश्यक आहे.
बँक खात्यांसाठीही लवकरच येणार नंबर पोर्टेबिलिटी!
ग्राहकांनी बँक बदलली तरी त्याचा खाते क्रमांक तोच राहायला हवा, असे सांगत, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी खाते
By admin | Published: June 1, 2017 12:46 AM2017-06-01T00:46:55+5:302017-06-01T00:46:55+5:30