Join us

NVIDIA कंपनीने Apple ला टाकलं मागं; 'या' एका गोष्टीमुळे टेक इंडस्ट्रीमध्ये गाजवतेय वचर्स्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:19 IST

NVIDIA: आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने एनव्हिडिया आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे सोडत आहे. यावेळी पुन्हा आयफोन निर्माता Apple ला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे.

NVIDIA : सध्या जगभरात AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) बोलबाला आहे. घरातील हातातल्या मोबाईलपासून रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांपर्यंत सगळीकडे आज एआयवर आधारित तंत्रज्ञान वापरले जात आहे. याच जोरादावर आता आघाडीची टेक कंपनी Nvidia ने पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब पटकावला आहे. चिपमेकर एनव्हिडीयाने ही किमया केली आहे. या स्पर्धेत एनव्हिडियाने अ‍ॅपलला धोबीपछाड देत पहिला नंबर गाठला आहे. एनव्हिडिया एआय हार्डवेअर मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे. एस & पी ५०० निर्देशांकात कंपनीचे ७ टक्के वजन आहे. आतापर्यंत कंपनीने निर्देशांकासाठी २१ टक्के वाढ साध्य केली आहे.

वर्षभरात Nvidia ची जोरदार वाढएनव्हिडीयाचे मार्केट कॅप जोरदार उसळीसह ३.४३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचलं आहे. ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करण्यासाठी कंपनीला AI च्या मदतीने जबरदस्त वाढ दाखवण्याची संधी मिळाली आहे. कंपनीच्या AI प्रशिक्षण आणि रनिंग मॉड्युल्सद्वारे कंपनी या क्षेत्रात आपले स्थान टिकवून आहे. एनव्हिडीयाच्या वर्षभरातील स्फोटक वाढीमुळे व्यावसायिक वर्तुळ आश्चर्यचकित झाले असून गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

डेटा सेंटर्स आणि AI संशोधकांमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा Nvidia ला फायदाएआयची वाढती मागणी हाताळण्यासाठी कंपनीने प्रामुख्याने डेटा सेंटर्स आणि AI संशोधकांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याच्या रिटर्नमध्ये एनव्हिडीयाचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. कालच्या व्यापारात एनव्हिडीया कॉर्पचे शेअर्स १४५.६१ यूएस डॉलरवर बंद झाले. यामध्ये ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन बाजार बंद झाले. एनव्हिडीया शेअर बाजारात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे सोडत आहे.

AI हार्डवेअरमुळे कंपनीची गरूडझेपटेक इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स वर्चस्व गाजवत आहे. Apple, Alphabet, Microsoft आणि Meta सारख्या सर्व टेक दिग्गज या क्षेत्रात उड्या टाकत आहेत. AI गुंतवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून या टेक कंपन्या त्यांची उत्पादने आणि सेवांचा विस्तार करत आहेत. Nvidia या सर्वांना जागतिक स्तरावर चीप पुरवून अग्रेसर राहिली आहे.

टॅग्स :अॅपलआर्टिफिशिअल इंटेलिजन्सतंत्रज्ञान