चिप क्षेत्रातील दिग्गज जागतिक कंपनी एनव्हीडिया कॉर्पच्या (Nvidia Corp) शेअरमध्ये ९.५ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घसरण झाली. मंगळवारी हुआंग यांची संपत्ती सुमारे १० अब्ज डॉलर्सनं घसरून ९४.९ अब्ज डॉलर्सवर आली. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स २०१६ पासून त्यांची संपत्ती ट्रॅक करत आहे. त्यानंतर हुआंग यांच्या संपत्तीत झालेली ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.
एनव्हीडियाच्या मार्केट कॅपला २७९ अब्ज डॉलरचा फटका बसला. एका दिवसात अमेरिकन कंपनीच्या बाजारमूल्यात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. PHLX चिप इंडेक्स ७.७५ टक्क्यांनी घसरला. ही २०२० नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती.
Nvidia विरुद्ध अँटीट्रस्ट चौकशी
ब्लूमबर्गच्या मते, हुआंग यांच्या संपत्तीला मोठा धक्का बसण्याचं एक कारण म्हणजे अमेरिकेच्या न्याय विभागनं अँटीट्रस्ट चौकशीचा भाग म्हणून एनव्हीडियाला समन्स बजावलं आहे. जगातील काही मोठ्या कंपन्यांसाठी एनव्हीडिया चिप सप्लाय चेनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये तपासाशी परिचित लोकांच्या हवाल्यानं म्हटलंय की, अमेरिकेचा न्याय विभाग आता लीगली बाइंडिंग रिक्वेस्ट पाठवत आहे, ज्यामुळे माहिती पुरवणं बंधनकारक होतं. यामुळे सरकार औपचारिक तक्रार दाखल करण्याच्या आणखी एक पाऊल जवळ आलं आहे.
काय आहेत आरोप?
लोकांच्या मते, अँटीट्रस्ट अधिकाऱ्यांना असं वाटतंय की एनव्हीडिया मुळे इतर सप्लायर्सकडे जाणं कठीण होत आहे. केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप्सचा वापर न करणाऱ्या खरेदीदारांनाही समस्या होत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार हुआंग हे जगातील १८ व्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.