Join us

‘एनव्हिडिया‘’च्या कमाईनं मस्क यांना टाकलं मागे, वर्षभरात भांडवल २ ट्रिलियन डॉलरनं वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:03 IST

ही रक्कम इलॉन मस्क यांच्या एकूण ४१५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीपेक्षा पाच पट अधिक आहे. ॲपलनंतर एनव्हिडिया ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत कंपनी ठरली आहे.

एआय चीप तयार करणाऱ्या एनव्हिडिया या कंपनीने एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत जोरदार कामगिरी करीत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनाही मागे टाकले. मागील वर्षात कंपनीने सर्वाधिक बाजार भांडवल उभे केले. कंपनीचे शेअर्स १७० टक्क्यांनी वाढल्याने बाजार भांडवलात २ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. ही रक्कम इलॉन मस्क यांच्या एकूण ४१५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीपेक्षा पाच पट अधिक आहे. ॲपलनंतर एनव्हिडिया ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत कंपनी ठरली आहे.

जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी म्हणून ॲपलचे स्थान कायम आहे. या कंपनीचे भांडवल ४ ट्रिलिय डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. ॲपलनेही एआयवर लक्ष केंद्रित केल्याने भविष्यात आणखी लाभ होऊ शकतो.

कमाई कशाने वाढली?

कंपनीच्या या वाढीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये  गुंतवणूकदारांनी दाखवलेला अधिक रस हे मुख्य कारण आहे. विविध उद्योगांमध्ये एआय-सेंट्रिक चिप्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचाही कंपनीला लाभ झाला आहे. 

२०२३ च्या अखेरीस कंपनीचे बाजार मूल्य १.२ ट्रिलियन डॉलर इतके होते. २०१४ च्या अखेरीस बाजार मूल्य ३.२८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. मागील वर्षात कंपनीचे शेअर्समध्ये २४० टक्क्यांनी वाढले होते.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कव्यवसाय