Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹११२५ वर आलेला IPO, आज ₹१४४ वर आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

₹११२५ वर आलेला IPO, आज ₹१४४ वर आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

या शेअरला आता लार्जकॅपवरून मिडकॅपमध्ये डाऊनग्रेडही करण्यात आलंय. यात आणखी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:24 PM2023-07-05T16:24:36+5:302023-07-05T16:25:07+5:30

या शेअरला आता लार्जकॅपवरून मिडकॅपमध्ये डाऊनग्रेडही करण्यात आलंय. यात आणखी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश आहे.

nykaa IPO issue price 1125 rs today hit rs 144 a huge loss for investors know details downgrade to midcap from largecap | ₹११२५ वर आलेला IPO, आज ₹१४४ वर आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

₹११२५ वर आलेला IPO, आज ₹१४४ वर आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

Nykaa Stock: नायकाच्या शेअर्समध्ये आज बुधवारी पुन्हा घसरण झाली आहे. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचे शेअर्स 143 रुपयांवर बंद झाले. नायकाचे शेअर्स 248 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून जवळपास 42 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. यानंतर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाद्वारे (AMFI) फॅशन आणि ब्युटी ई-टेलर नायकाला लार्जकॅप वरून मिडकॅप श्रेणीत आणण्यात आलंय.

म्युच्युअल फंड संस्था दर सहा महिन्यांनी एकदा त्यांच्या मार्केट कॅपच्या आधारे शेअर्सला डिव्हाईड करते. प्रमुख 100 शेअर्सना त्यांच्या बाजार मूल्यानुसार लार्जकॅप्स म्हणून टॅग करण्यात आलं आहे. 101-250 रँकमधील मधील शेअर्सना मिडकॅप मानलं जातं, तर इतर प्रमुख 500 यादीतील (251-500) स्मॉलकॅप्स मानले जातात.

हे शेअर्स डाऊनग्रेड
केवळ नायकाच नाही, जेएसडब्ल्यू एनर्जी, टाटा इलेक्सी, इंडस टॉवर्स, मायक्रोटेक डेव्हलपर्स आणि इन्फो एजदेखील मिडकॅप्समध्ये डाऊनग्रेड करण्यात आले आहेत. मिडकॅप्सवरून स्मॉलकॅप्समध्ये डाऊनग्रेड झालेल्या शेअर्समध्ये पिरामल फार्मा, टाटा टेली, फाइन ऑरगॅनिक, क्लीन सायन्स, डॉ लाल पॅथलॅब्स आणि ब्लू डार्ट एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

११२५ रुपयांवर आलेला आयपीओ
नायकाचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाले. त्यांच्या इश्यू प्राईज ११२५ रुपये ठेवण्यात आली होती. त्याची लिस्टिंग 2000 रुपयांच्या पुढे गेली होती. याचा अर्थ लिस्टिंगच्या वेळीच गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट नफा मिळाला होता. दरम्यान, आता नायकाचा स्टॉक त्याच्या इश्यू प्राईजपेक्षा 87.2 टक्क्यांनी घसरला आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: nykaa IPO issue price 1125 rs today hit rs 144 a huge loss for investors know details downgrade to midcap from largecap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.