Join us  

₹2054 वर झाली होती IPO ची लिस्टिंग, आता ₹132 वर आला भाव; गुंतवणूकदार कंगाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 3:19 PM

गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 54.29 टक्के, तर तीन महिन्यांत 12.09 टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअर बाजारात Nykaa च्या शेअरमध्ये गुरुवारी घसरण बघायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारातच कंपनीचे शेअर्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरले. यापूर्वी मंगळवारी या शेअर्सनी 9 टक्क्यांपर्यंतची उसळी घेतली होती. कंपनीचा शेअर सध्या बीएसईवर 2.38 टक्क्यांनी घसरून 132.65 रुपयांवर आला आहे. महत्वाचे म्हणजे, Nykaa चे शेअर IPO पूर्वीच्या गुंतवणूकदारांचा लॉक-इन पिरिअड संपल्यानंतरपासूनच दबावात होते.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती - गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 54.29 टक्के, तर तीन महिन्यांत 12.09 टक्क्यांची घसरण झाली आहे. प्री-आईपीओ गुंतणूकदारांचा लॉक-इन पिरिअड संपल्यापासून कंपनीचे शेअर दबावात आहेत. दुसरीकडे, कंपनीमध्ये मॅनेजमेंट लेव्हलवरही मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. नुकताच पाच अधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे. यांत चीफ कमर्शिअल ऑपरेशन्स ऑफिसर मनोज गांधी, फॅशन डिव्हिजनचे चीफ बिझनेस ऑफिसर गोपाल अस्थाना आणि होलसेल बिझनेसचे मुख्य एक्जीक्यूटिव्ह ऑफिसर विकास गुप्ता यांचा समावेश आहे. 

नायकाचा आयपीओ 2021 मध्ये आला होता. याच्या आयपीओची प्राइस ₹1125 निश्चित करण्यात आली होती. BSE वर नायकाच्या शेअरची लिस्टिंग 2054 रुपयांना झाली होती. Nykaa शेअर प्राइस आउटलुकवर चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी निदेशक, सुमीत बगडिया म्हणाले, “Nykaa शेअर्सला ₹145 ते ₹150 च्या रेंजमध्ये कठीन जात आहे आणि फॅशन स्टॉकला 125 ते ₹130 प्रति शेअरच्या पातळीवर समर्थन मळत आहे.  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक