Join us

Nykaa करणार गुंतवणूकदारांना मालामाल, १ शेअरवर देणार ५ बोनस शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 3:06 PM

सोमवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

Nykaa ने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १ च्या मोबदल्यात ५ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कंपनी प्रत्येक 1 शेअरमागे गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स देईल. सोमवारी, 3 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारावर (BSE) वर सुमारे 8 टक्के वाढीसह 1370.65 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

Nykaa ने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत 5:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख गुरुवार, 3 नोव्हेंबर 2022 अशी निश्चित केली आहे. बोनस शेअर्स 2 डिसेंबर किंवा त्यापूर्वीच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध असतील. Nykaa ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd चा 52 आठवड्यांचा उच्चांक 2574 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1208.40 रुपये आहे.

आतापर्यंत 35 टक्क्यांची घसरणNykaa चे शेअर्स या वर्षी आतापर्यंत सुमारे 35 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2086.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. Nykaa चे शेअर्स 3 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई शेअर बाजारावर 1370.65 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. Nykaa च्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत सुमारे 24 टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स जवळपास 39 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, Nykaa चे शेअर्स गेल्या 5 दिवसात 5 टक्क्यांनी वाढले आहेत.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार