Join us

ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:21 PM

PRS Oberoi: २००८ मध्ये ओबेरॉय यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

PRS Oberoi: ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंह ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं आज म्हणजेच मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांची ख्याती होती. पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल उद्योगांचा चेहरामोहरा बदलून टाकला. पीआरएस ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये ईआयएच लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडलं होते.महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स सुरू करुन आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी ओबेरॉय हॉटेल्सची सेवा सुरू करण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना जाते. अनेक देशांमधील लक्झरी हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व प्रदान करण्याव्यतिरिक्त, ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या विकासात पीआरएस ओबेरॉय यांनी प्रमुख भूमिका बजावली असल्याचं ओबेरॉय समूहाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय.पद्मविभूषणनं सन्मानपीआरएस ओबेरॉय यांना जानेवारी २००८ मध्ये देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय लक्झरी ट्रॅव्हल मार्केटनं (ILTM) डिसेंबर २०१२ मध्ये त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि विकासातील योगदानाबद्दल जागतिक स्तरावर त्यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. ओबेरॉय ग्रुप ही जगातील आघाडीच्या लक्झरी हॉटेल चेनपैकी एक आहे.

टॅग्स :व्यवसाय