Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:44 PM2023-02-28T12:44:02+5:302023-02-28T12:44:46+5:30

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची भेट घेतली.

Odisha Chief Minister Naveen Patnaik met reliance industries Mukesh Ambani see what issues were discussed investment business | ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची भेट घेतली. नवीन पटनायक यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. या भेटीदरम्यान पटनायक यांनी ओडिशामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकीच्या योजनांवर चर्चा केली. 

राज्यात गुंतवणूकीच्या चर्चांबाबत ओदिशा सरकार सातत्यानं उद्योजकांना ऑफर देत आहे. याचदरम्यान, पटनायक यांनी मुकेश अंबानी यांची भेट घेतली. ओडिशा इन्व्हेस्टर्स मीटद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी यांची भेट घेतली अशी माहिती पटनायक यांनी ट्विटरद्वारे दिली. तसंच त्यांनी ओडिशामध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधी पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. यादरम्यान इंडस्ट्री सेक्टरमध्ये गुंतवणूकीबाबत असलेल्या अनुकूल वातावरणाबाबतही त्यांना माहिती देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

बायो टेक सेक्टरमध्ये गुंतवणूकीचं निमंत्रण
रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या बायो-आशिया परिषदेदरम्यान अशोक पांडा यांनी गुंतवणूकदारांना बायो-टेक क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रणही दिले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशोक चंद्र पांडा म्हणाले, 'भारत बायोटेकने आपल्या अँकर टेनेंट सॅपीजेन बायोलॉजिक्सच्या माध्यमातून भुवनेश्वरजवळील अंधारुआ येथील ओडिशा बायोटेक पार्कमध्ये विविध लसींच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आहे. त्याच्या विस्तारासाठी आणखी ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. अस्तित्वात असलेल्या बायो-इन्क्युबेटर्समध्ये स्टार्टअपसाठी वाढणारी इको-सिस्टम आधीच देशातील इतर राज्यांच्या बरोबरीने प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Web Title: Odisha Chief Minister Naveen Patnaik met reliance industries Mukesh Ambani see what issues were discussed investment business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.