देशात 5G सेवा सुरू होऊन काही महिने झाले, पण अजुनही संपूर्ण देशात 5G सेवा सुरू झालेली नाही. आता जिओने संपूर्ण देशात ही सेवा सुरू करण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. जिओने यासाठी नव्या प्लन्सची घोषणाही केली आहे.
Jio ने सर्वात स्वस्तचा रिचार्ज लाँच केला आहे. यात 61 रुपयांचा रिचार्ज आहे. हा प्लॅन सर्वात जास्त चालणारा प्लॅन आहे.
तुम्ही 61 रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला जास्त फायदे मिळू शकतात. या रिचार्जवर तुम्हाला 5G इंटरनेटचे स्पीड मिळणार आहे, पण हे इंटरनेट अनलिमिटेड नसणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 6GB पर्यंत इंटरनेट दिले जाते. यात तुम्हाला 5G सेवेचा वापर करायचा असेल तर तुम्हाला वेलकम ऑफर ऑपर घ्यावी लागणार आहे.
जर तुम्हाला चांगले इंटरनेट हवे असेल तर तुम्ही My Jio अॅपला भेट देऊन या प्लॅनसाठी सहज नोंदणी करू शकता. एकदा तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्ही ही योजना सहज खरेदी करू शकता. तुम्हाला रिचार्ज प्लॅनच्या यादीत जाऊन पाहावे लागेल. Jio 155 प्रीपेड प्लॅन असाच आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते, पण संपूर्ण महिन्यासाठी 2GB डेटा दिला जातो.
या प्लॅनसह Jio 61 रिचार्ज करून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. कारण या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेटची सुविधा मिळते, पण Jio 155 रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच, एसएमएस सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे ती तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. पण तुम्हाला हा प्लान My Jio अॅपवरून रिचार्ज करावा लागेल.