Lokmat Money > बिझनेस न्यूज > सौदी अधिभारामुळे तेलासाठी पर्यायी देशांचा प्रस्ताव

सौदी अधिभारामुळे तेलासाठी पर्यायी देशांचा प्रस्ताव

सौदी अरेबियाने आशियाई देशांना तेल विक्रीवर प्रति बॅरल ६० सेंट अधिभार लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताने आफ्रिकन देशांकडे तेल खरेदीचा रोख वळविला आहे

By admin | Published: January 23, 2016 03:43 AM2016-01-23T03:43:45+5:302016-01-23T03:43:45+5:30

सौदी अरेबियाने आशियाई देशांना तेल विक्रीवर प्रति बॅरल ६० सेंट अधिभार लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताने आफ्रिकन देशांकडे तेल खरेदीचा रोख वळविला आहे

Offer of alternative countries for oil because of Saudi occupation | सौदी अधिभारामुळे तेलासाठी पर्यायी देशांचा प्रस्ताव

सौदी अधिभारामुळे तेलासाठी पर्यायी देशांचा प्रस्ताव

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने आशियाई देशांना तेल विक्रीवर प्रति बॅरल ६० सेंट अधिभार लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताने आफ्रिकन देशांकडे तेल खरेदीचा रोख वळविला आहे. केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, सौदी अरेबियाची राष्ट्रीय तेल व नैसर्गिक वायू कंपनी आर्मको फेब्रुवारीपासून अरब लाईट कच्च्या तेलावर ६० सेंट अधिभार आकारणार आहे. हे महाग तेल घेण्यापेक्षा आफ्रिकेतून कच्चे तेल विकत घ्यावे, असा विचार पुढे आला असून तसा प्रयत्न सुरू आहे.
तेलाचे देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे सौदीला अधिभार देण्यापेक्षा इतर आफ्रिकन देशातून तेल आयात शक्य होते का यावर सध्या विचार सुरू आहे. ‘ओएनजीसी’ व ‘ओव्हीएल’ या कंपन्यांनी सुदान, दक्षिण सुदान व मोझांबिकमध्ये तेल क्षेत्रात गुंतवणूक केलेली असून असाच प्रयत्न आणखी काही देशात करता येईल का याचा आढावा घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Offer of alternative countries for oil because of Saudi occupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.