नवी दिल्ली - एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी फुल्ल टू धमाल ऑफर सुरू केली आहे. त्यानुसार ग्राहकांना 5 लिटर मोफत पेट्रोल मिळणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही रिटेल पेट्रोल पंपावर भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार केल्यास ग्राहकाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवता येणार आहे. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही योजना सुरू असणार आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि भीम अॅपच्या युजर्संची संख्या वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच 'BHIM' होय. अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्ही व्हर्जनमध्ये हे अॅप युजर्संना डाऊनलोड करता येऊ शकते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप बनवले आहे, जे युपीएवर काम करते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 100 रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. त्यानंतर, भीम अॅपद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. त्यानंतर, तुमचा नंबर सिलेक्ट झाल्यास तुम्हाला एसबीआयकडून तसा मेसेज येईल. त्यामुळे तुम्ही 5 लिटर मोफत पेट्रोल योजनेसाठी पात्र ठरणार आहात. या योजनेंतर्गत एका दिवसाला 10 हजार ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत जिंकण्याची संधी आहे.
Fuel your drive at any Indian Oil Retail outlet with BHIM SBI Pay and get up to 5 litres of petrol free! Hurry! Offer valid till 23rd November 2018. For more details on the offer, visit: https://t.co/2OAnjbA2m1#SBI#IndianOil#NPCI#Offer#Deal#Fuel#Petrol#BHIMSBIPay#UPIpic.twitter.com/XUVAxeVO6u
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 19, 2018