Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ऑफिसर्स चॉईस' तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO, किती आहे प्राईज बँड? जाणून घ्या संपूर्ण माहिती

'ऑफिसर्स चॉईस' तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO, किती आहे प्राईज बँड? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुंतवणूकदारांना २५ जून ते २७ जून या कालावधीत बोली लावता येईल. पाहा या आयपीओचे संपूर्ण डिटेल्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:19 PM2024-06-20T15:19:45+5:302024-06-20T15:20:03+5:30

गुंतवणूकदारांना २५ जून ते २७ जून या कालावधीत बोली लावता येईल. पाहा या आयपीओचे संपूर्ण डिटेल्स.

Officer-s-Choice-allied-blenders-and-distillers-ipo-price-band-fixed-at-rs-267-281-apiece-check-issue-details | 'ऑफिसर्स चॉईस' तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO, किती आहे प्राईज बँड? जाणून घ्या संपूर्ण माहिती

'ऑफिसर्स चॉईस' तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO, किती आहे प्राईज बँड? जाणून घ्या संपूर्ण माहिती

व्हिस्की, ब्रँडी, जिन, रम, व्होडका आदींचं उत्पादन करणाऱ्या अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सचा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात येणार आहे. गुंतवणूकदारांना २५ जून ते २७ जून या कालावधीत बोली लावता येईल. आयपीओचा प्राइस बँड २६७ ते २८१ रुपये निश्चित करण्यात आला असून त्याची फेस व्हॅल्यू २ रुपये आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २४ जून रोजी अँकर गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येईल.
 

काय आहे अधिक माहिती?
 

कंपनीच्या आरएचपीनुसार, ही भारतीय बनावटीची विदेशी मद्य किंवा आयएमएफएलची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. देशांतर्गत बाजारात विक्रीच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठेतही त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आयपीओ अंतर्गत कंपनी १,५०० कोटी रुपयांचा इश्यू आणत आहे. यामध्ये १,००० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि प्रवर्तक आणि इतर गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.
 

काय आहे प्राईज बँड?
 

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं प्रति शेअर २६७ ते २८१ रुपयांपर्यंत किंमत निश्चित केली आहे. त्याची फेस प्राइस २ रुपये प्रति शेअर आहे. अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आयपीओचे सब्सक्रिप्शन ओपनिंग २५ जून रोजी सुरू होईल आणि २७ जून रोजी बंद होईल. अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांना वाटप २४ जून रोजी होणार आहे. फ्लोअर प्राइस इक्विटी शेअर्सच्या फेस व्हॅल्यूच्या १३३.५० पट आहे आणि कॅप प्राइस इक्विटी शेअर्सच्या फेस व्हॅल्यूच्या १४०.५० पट आहे, असं लाईव्ह मिंटनं म्हटलं आहे. प्रत्येकी दोन रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या किमान ५३ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल.
 

लिस्टिंग डेट काय असेल?
 

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आयपीओसाठी शेअर्सचे वाटप २८ जून रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेअर्सचं वाटप झालं आहे की नाही हे त्या दिवशी ग्राहकांना कळेल. ज्यांना शेअर्स चे वाटप करण्यात आलेले नाही, त्यांना कंपनी १ जुलैपासून परतावा देण्यास सुरुवात करेल, तर परताव्यानंतर त्याच दिवशी शेअर्स अलॉटीजच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सचे शेअर २ जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे.  हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Officer-s-Choice-allied-blenders-and-distillers-ipo-price-band-fixed-at-rs-267-281-apiece-check-issue-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.