सिंगापूर : अमेरिकन डॉलर महाग होताच येथील बाजारात तेल सोमवारी स्वस्त झाले. जपानच्या मध्यवर्ती बँकेने बँकेचे कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी शून्य दराखाली व्याज धोरण अवलंबिल्यामुळे बाजारपेठेला धक्का बसल्यामुळे डॉलर महागला.अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे मार्च महिन्याच्या डिलिव्हरीचे तेल ४९ सेंट्सने (१.४६ टक्के) स्वस्त होऊन ३३.१३ अमेरिकन डॉलर झाले. ब्रेंटचे एप्रिलच्या डिलिव्हरीचे कच्चे तेल ५३ सेंट्सने (१.४७ टक्के) स्वस्त होऊन ३५.४६ अमेरिकन डॉलरवर आले.तेलाच्या सतत खाली येणाऱ्या किमतींना रोखण्यासाठी तेल निर्यातदार देशांनी उत्पादनात घट करावी यावर चर्चा करण्यासाठी रशिया या देशांशी चर्चा करणार असल्याची अफवा होती. अशी काही चर्चा होईल याबद्दलच मुळात शंका व्यक्त करण्यात आली आणि तशी काही चर्चा झाली तरी तिचा परिणाम किती होईल याबद्दलही संशय व्यक्त झाला.
डॉलर महाग होताच तेल स्वस्त
By admin | Published: February 02, 2016 3:05 AM