Join us

Oil India LTD: नुकसान कसले, पेट्रोलिअम कंपन्या दुप्पट-तिप्पट कमवतायत; ऑयल इंडियाचा शुद्ध नफा पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:47 AM

देशातील मोठ्या ऑईल कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑयल इंडिया लिमिटेडचा शुद्द नफा हा गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे.

देशातील इंधनाच्या दरात एप्रिलमध्ये मोठी आणि वेगाने वाढ झाली. यानंतर दीड महिनाभराने केंद्र सरकारने वाढविलेले कर कमी केले. परंतू तरीही कंपन्या पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेल पुरेसे देत नाहीएत. म्हणे १५ ते २५ रुपयांचे नुकसान होत आहे. असे असले तरी याच दरवाढीमुळे या कंपन्या दुप्पट-तिप्पट नफा कमावतायत. सरकारी कंपनी ऑयल इंडिया लिमिटेडचा नफा पाहिलात, तर तुम्ही काय म्हणाल... 

देशातील मोठ्या ऑईल कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑयल इंडिया लिमिटेडचा शुद्द नफा हा गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. 2021-22 मध्ये 1,630.01 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 

कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. असे असले तरी कंपनीने जानेवारी-मार्चच्या तिमाहीत सर्वाधिक शुद्ध नफा कमावला आहे. कंपनीचे संचालक हरीश माधव यांनी शुक्रवारी सांगितले की, 2020-21 च्या अंतिम तिमाहीत कंपनीचा शुद्ध नफा 847.56 कोटी रुपये होता. 

2021-22 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय 27 टक्क्यांनी वाढून 4,972.91 कोटी रुपये झाला. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ते 55 टक्क्यांनी वाढून 16,427.65 कोटी रुपये झाले आहे. OIL च्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी याच आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने प्रति शेअर ९.२५ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. कच्च्या तेलाचे, नैसर्गिक वायूचे उत्पादन घेणारी ही देशाची मोठी कंपनी आहे. 

टॅग्स :पेट्रोलइंधन दरवाढ