Join us

आशियात तेलाचे भाव घसरले

By admin | Published: August 11, 2015 3:15 AM

आशियाच्या बाजारपेठेत सोमवारी तेलाच्या किमती खाली आल्या. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीचे तेल शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये ४३.८७ अमेरिकन डॉलर होते

हाँगकाँग : आशियाच्या बाजारपेठेत सोमवारी तेलाच्या किमती खाली आल्या. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीचे तेल शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये ४३.८७ अमेरिकन डॉलर होते, ते सोमवारी ४३.५७ अमेरिकन डॉलरवर आले. गेल्या मार्चच्या १७ तारखेनंतर तेलाची ही सगळ्यात कमी किंमत आहे. ब्रेंटचे कच्चे तेल (सप्टेंबरची डिलिव्हरी) शुक्रवारी ४८.६१ अमेरिकन डॉलर होते ते सोमवारी ४८.२५ अमेरिकन डॉलरवर आले. अमेरिकेतील तेल विहिरीतून वाढीव तेल उपसण्याचा हा सलग तिसरा आठवडा असल्यामुळे बाजारात जास्तीचे तेल दाखल होत आहे.