हाँगकाँग : आशियाच्या बाजारात गुरुवारी तेलाच्या किमती काहीशा वधारल्या. सध्या तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे किमती खाली येत आहेत व भाव वाढण्याची परिस्थिती अशीच कायम राहील, असे नाही असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे तेल बॅरलमागे ०.९० टक्क्यांनी महाग होऊन ४४.८८ अमेरिकन डॉलरवर गेले व ब्रेंटचे कच्चे तेल ०.६७ टक्क्यांनी वधारून ४८.०७ अमेरिकन डॉलरवर गेले. तेलाच्या किमती खाली आणणारे सगळे घटक अजूनही बाजारपेठेत आहेत, असे सिडनी येथील फॅट प्रोफेटस्चे विश्लेषक डेव्हिड लिनोक्स यांनी सांगितले. तेलाच्या उत्पादनात घट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आशियाच्या बाजारात तेल काहीसे सावरले
आशियाच्या बाजारात गुरुवारी तेलाच्या किमती काहीशा वधारल्या. सध्या तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे किमती खाली येत आहेत
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM2015-09-25T00:08:40+5:302015-09-25T00:08:40+5:30