नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे भाव सप्टेंबर-आॅक्टोबर कळसाला भिडले होते. त्यानंतर, १८ आॅक्टोबरपासून त्यात घट सुरू झाली, पण आता तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आपल्या ६ डिसेंबरच्या बैठकीत तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यास किमती पुन्हा वाढू शकतात.
आॅक्टोबर महिन्याच्या प्रारंभी कच्च्या तेलाच्या किमती ८७ डॉलर प्रति बॅरल या चार वर्षांच्या उच्चांकावर गेल्या होत्या. विश्लेषकांनी हा भाव १०० डॉलर होईल, असे भाकीत केले होते. परंतु, आॅक्टोबर मध्यापासून ते आतापर्यंत किमती ६० डॉलरच्याखाली आल्या आहेत. २०१५ पासून कच्च्या तेलाच्या किमती प्रथमच एवढ्या कमी झाल्या. अमेरिकेच्या सूचनेवरून सौदी अरेबियाने बाजाराला केलेल्या तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे हे दर घटले होते, पण आता सगळ्या नजरा ६ डिसेंबर रोजीच्या ओपेकच्या बैठकीतील निर्णयाकडे लागल्या आहेत.
तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रशिया सौदी अरेबियासोबत एकत्र येऊन काम करू शकेल. तेल उत्पादकांनी उत्पादन आणखी कमी करावे, अशी अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. एका ताज्या अहवालानुसार, तेलाचे दर सध्या समतोल असल्याचे म्हटले आहे. हे दर ग्राहकासाठी खूप महाग किंवा तेल कंपन्यांना तोट्यात निघेल, इतके अधिकही नाहीत, असे अहवालात नमूद आहे. यामुळे सौदी अरेबिया व रशिया यासारख्या तेल निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशांना उत्पादन आणखी वाढून दर कमी करण्यास वाव आहे.
>तेल कंपन्यांची दरकपात कायम ; पेट्रोल ७८च्या खाली
सरकारी मालकीच्या किरकोळ इंधन विक्रेत्यांनी शनिवारी पेट्रोलचा भाव ३४
तर डिझेलचा भाव लीटरमागे ३७ पैशांनी कमी केला होता. पेट्रोलचा भाव यामुळे दिल्लीत लीटरला ७२.५३, मुंबईत ७८.०९, बंगळुरूत ७३.०९, चेन्नईत ७५.२६ आणि ७४.५५ रुपये कोलकातात झाला. डिझेलचा भाव लीटरला दिल्लीत ६७.३५, मुंबईत ७०.५०, बंगळुरूत ६७.७०, चेन्नईत ७५.२६ तर कोलकात्यात ७४.५५ रुपये होता.
ओपेकने उत्पादन घटविल्यास तेलाचे भाव पुन्हा भडकणार?
पेट्रोल आणि डिझेलचे भाव सप्टेंबर-आॅक्टोबर कळसाला भिडले होते. त्यानंतर, १८ आॅक्टोबरपासून त्यात घट सुरू झाली..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:50 AM2018-12-03T04:50:33+5:302018-12-03T04:50:40+5:30