मुंबई : प्रसिद्ध रेडियो कॅब सर्व्हीस ओलाने इंग्लडमधील लिव्हरपूलमध्ये बजाज आॅटोरिक्षांची स्वस्तातील सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना शहराच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात प्रवास करता यावा या हेतुने ही सेवा सुरू करण्यात आल्याचे बजाज आॅटोच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.इंग्लडमधील टॅक्सी सेवेच्या नियमांनुसार बजाज आॅटोरिक्षांना निओन ग्रीन रंगात रंगवले असून चालकांचा (ड्रायव्हर्स) गणवेशही त्याच रंगाचा आहे. याचबरोबर ओलाने लिव्हरपूलमध्ये पियाज्जियो टुकटुकचा ताफाही सुरू केला आहे. सेवेचा प्रारंभ म्हणून ओलाने ओलाचे मोबाईल अॅप्प डाऊनलोड करून त्याचा उपयोग आॅटोरिक्षा बोलावण्यासाठी करणाऱ्या प्रवाशांना ५० टक्के सवलत देऊ केली आहे. जगभरातील आपली प्रतिस्पर्धी कंपनी उबर रेडियो कॅबला ताब्यात घेण्याचा हेतू असलेल्या बजाज आॅटोरिक्षाने आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत उत्तम ग्राहकसेवा आणि चालकांना कमिशन देत असतो, असा दावाही केला आहे.ओला रेडियो कॅब सेवेने इंग्लडमध्ये गेल्या वर्षी आॅगस्टमहिन्यात कार्डिफसह प्रवेश केला होता आणि नंतर आपला कारभार आॅक्टोबरमध्ये ब्रिस्टोलमध्ये तर नोव्हेंबरमध्ये बाथ आणि एक्झेटरमध्ये व आता लिव्हरपूलमध्ये विस्तारला आहे.
ओलाची इंग्लडमधील लिव्हरपूलमध्ये बजाज ऑटोरिक्षाची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:59 AM