Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:20 PM2023-08-03T17:20:57+5:302023-08-03T17:21:08+5:30

मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे.

Ola balloon burst? Vanguard pegs Ola's valuation at 3.5 billion down; A decrease of 52 percent | ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

गेल्या दोन वर्षांतच पाच-सहा अब्ज डॉलर्सची कंपनी बनणाऱ्या ओला ईव्हीचे बाजारमुल्य अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापन कंपनी व्हॅनगार्ड ग्रुपने निम्म्याने घटविले आहे. ओलाला सुमारे ११०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याच्या वृत्तानंतर आता हा देखील एक धक्का मानला जात आहे. 

व्हॅनगार्ड ग्रुपने ओलाचे मुल्ल्यांकन 7.3 अब्ज डॉलर्सवरून 3.5 अब्ज केले आहे. फर्मच्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज फाइलिंगनुसार, 31 मे 2023 पर्यंत भावेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील मोबिलिटी प्लॅटफॉर्ममध्ये Vanguard कडे 1,66,185 शेअर्स किंवा सुमारे 0.7% स्टेक होते. कंपनीने ओलामधील शेअर्सचे वाजवी मूल्य ठरवले आहे. 51,748,000 डॉलरवरून ते 25,038,000 वर आणले आहे. 

तीन वर्षांत मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने ओलाचे मूल्यांकन कमी करण्याची ही चौथी वेळ आहे. फेब्रुवारीमध्ये, Vanguard ने Ola चे मूल्यांकन 35% ने कमी करून $7.3 बिलियन वरून $4.8 अब्ज केले होते. Vanguard ने Ola चे मूल्यांकन 2021 मध्ये 9.5% आणि 2020 च्या H1 मध्ये 45% ने कमी केले होते. Ola प्रमाणेच, Byju's आणि Swiggy सारख्या टेक स्टार्ट-अपच्या मुल्यांकनात कपात करण्यात आली आहे. 

मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे. घोषित महसूल लक्ष्य कंपनीला गाठता आलेले नाही. कंपनी $700 दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांकडे नुकसानीची माहिती दिलेली नाहीय.  2021 च्या उत्तरार्धात विक्री झाल्यापासून ओलाने 32 टक्के ईलेक्ट्रीक स्कूटरचे मार्केट व्य़ापले आहे. 2019 पासून गुंतवणूकदारांकडून सुमारे $800 दशलक्ष उभे केले आहेत. गेल्या वर्षी कंपनीचे बाजारमुल्य हे $5 अब्ज एवढे होते. 

Web Title: Ola balloon burst? Vanguard pegs Ola's valuation at 3.5 billion down; A decrease of 52 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Olaओला