Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा

तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा

Ola drivers : ओलाने मंगळवारी सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर पार्टनर आता राइड सुरू करण्यापूर्वीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि ते रोख किंवा ऑनलाइनद्वारे पेमेंट करणार आहेत, हे पाहण्यास सक्षम असणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:46 PM2021-12-22T12:46:38+5:302021-12-22T12:47:51+5:30

Ola drivers : ओलाने मंगळवारी सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर पार्टनर आता राइड सुरू करण्यापूर्वीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि ते रोख किंवा ऑनलाइनद्वारे पेमेंट करणार आहेत, हे पाहण्यास सक्षम असणार आहेत. 

Ola drivers will now see approximate drop location, payment mode before accepting ride | तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा

तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा

नवी दिल्ली : तुम्ही ऑफिसला किंवा इतर कुठेही जाण्यासाठी ओला (Ola) कॅब बुक केल्यास, कधीतरी कॅब ड्रायव्हरने तुमची राइड रद्द केली असेल किंवा तुम्हाला कुठे जायचे आहे, असे विचारले असेल. पण आता तसे होणार नाही. आता कॅब ड्रायव्हर तुमचे डेस्टिनेशन लोकेशन विचारणार नाही. दरम्यान, ओलाने मंगळवारी सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर पार्टनर आता राइड सुरू करण्यापूर्वीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि ते रोख किंवा ऑनलाइनद्वारे पेमेंट करणार आहेत, हे पाहण्यास सक्षम असणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका ट्विटमध्ये ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की, ड्रायव्हरद्वारे राइड रद्द करणे, ही या संपूर्ण मोबाइल अॅप आधारित व्यवसायाची मोठी समस्या आहे. कंपनीला ते बंद करायचे आहे. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयानंतर याचा फायदा असा होणार आहे की, जर कोणत्याही कॅब ड्रायव्हरला राइड रद्द करायची असेल तर तो लगेचच करेल. त्यामुळे प्रवाशांना थांबावे लागणार नाही आणि त्यांचा वेळही वाचेल. दरम्यान, बऱ्याचदा ओला कॅब किंवा बाईक बुक करणाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. 

अनेक वेळा बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर कॅब ड्रायव्हर प्रवाशाला पिक-अप स्थानावर पोहोचण्यापूर्वी कॉल करतात आणि त्यांना कुठे जायचे आहे आणि पेमेंट रोख किंवा ऑनलाइन मिळेल, याबाबत विचारतात. यानंतर प्रवासी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न मिळाल्यास कॅब ड्रायव्हर डेस्टिनेशन जाण्यास नकार देतात आणि राईड रद्द करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा प्रवाशांचे मोठे नुकसान होते. प्रवाशांना आपल्या डेस्टिनेशनवर वेळेवर पोहोचता येत नाही. कॅब ड्रायव्हर्सनाही याचा फायदा होईल, जर एखाद्या ठिकाणी जाणे त्यांच्यासाठी सोयीचे नसेल तर ते राइड रद्द करू शकतात.

Web Title: Ola drivers will now see approximate drop location, payment mode before accepting ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Olacarओलाकार