Join us  

Ola Electric Mobility : IPO मुळे चमकलं ओलाच्या भाविश अग्रवाल यांचं नशीब; झाली छप्परफाड कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:35 PM

Ola Electric Mobility : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सीईओ भाविश अग्रवाल यांचं नशीब सध्या चमकत आहे. कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. फ्लॅट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

Ola Electric Mobility : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सीईओ भाविश अग्रवाल यांचं नशीब सध्या चमकत आहे. कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. फ्लॅट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीत त्यांचा एकूण हिस्सा ३०.०२ टक्के आहे. कंपनीच्या शेअर मार्केट लिस्टिंगनंतर मंगळवारी त्यांचं नेटवर्थ २१००० कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं.

गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

आयपीओसाठी कंपनीनं ७२ ते ७६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये १५४ रुपयांवर उघडला आणि १५७.५३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ही किंमत इश्यू प्राइसच्या दुप्पट आहे. मात्र, यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

लिस्टिंगनंतर भाविश अग्रवाल यांच्याकडे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एकूण १,३२,३९,६०,०२९ शेअर्स होते. दिवसभरातील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर त्यांची नेटवर्थ ८३.८७ रुपयांच्या एक्सचेंज रेटवर २०,८५६ कोटी रुपये होती. आयपीओच्या वेळी भाविश अग्रवाल यांनी एकूण २८८ कोटी रुपयांचे शेअर्सही विकले होते. त्याचाही समावेश केल्यास त्यांची एकूण संपत्ती २१,१४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा शेअरमध्ये अधिक वाढ

ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने ओला इलेक्ट्रिकसाठी १४० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं होतं. मंगळवारी कंपनीचा शेअर ७.८७ टक्क्यांनी वधारून १५७.५३ रुपयांवर पोहोचला. हे आयपीओच्या अपर प्राईज बँडच्या तुलनेत १०७ टक्के अधिक आहे. मात्र, यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरून १३५.१९ रुपयांवर आला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाइनिशिअल पब्लिक ऑफरिंग