Join us

OLA चा EV क्षेत्रात मोठा डाव! तुम्हीही जिंकू शकता गोल्ड प्लेटेड S1 Pro; भाविश अग्रवालांची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:05 IST

ola electric touchpoints : ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे.

ola electric touchpoints :ओला इलेक्ट्रिक कंपनी, दुचाकी बाजारात आणल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. कधी त्यांच्या भन्नाट ऑफर्समुळे तर कधी वाहन नादुरुस्त झाल्याने ग्राहकांच्या रोषामुळे. ही कंपनी इतकी वादात सापडली होती की सरकारलही दखल घ्यावी लागली. मात्र, त्यानंतरही ओला कंपनी थांबायचं नाव घेताना दिसत नाही. एकीकडे खराब सर्व्हिसमुळे टीका होत असताना दुसरीकडे दर्जेदार ऑफर्समुळे कंपनीचा खप काही कमी झालेला नाही. अशात आता ओला कंपनीने मोठा डाव टाकला आहे. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी OLA इलेक्ट्रिकने आज इतिहास रचला आहे. ओला इलेक्ट्रिकने आज देशभरात ४००० स्टोअर्स उघडली आहेत. 

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच ८०० स्टोअर्स होती. आता कंपनीने ३२०० नवीन स्टोअर्स उघडून इतिहास रचला आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. भाविश अग्रवाल म्हणाले की, ओला इलेक्ट्रिकने देशात एकूण ४००० टचपॉइंट उघडले आहेत. देशातील विविध शहरांमध्ये हे नवीन टचपॉइंट उघडण्यात आले आहेत.

OLA इलेक्ट्रिकचा चमत्कार विविध शहरांमध्ये ही एक्सपीरियन्स केंद्रे उघडण्यात आली आहेत. ओलाच्या ग्राहकांना या टचपॉइंट्सचा लाभ मिळणार असून ते विविध सेवांचा लाभ घेऊ शकतील. भाविश अग्रवाल यांनी एका पोस्टमध्ये सांगितले होते की, Ola S1 Pro Sona 24k सोन्याने मढवलेले असेल. ग्रॅब हँडलपासून ते व्हील रिम्सपासून पायाच्या पेग्सपासून ते बाजूच्या स्टँडपर्यंत सगळीकडे खरे सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की २५ डिसेंबरला तुमच्या जवळच्या ओला स्टोअरला भेट द्या. आणि ही गोल्ड ओला एस1 प्रो जिंकण्याची संधी मिळवा.

OLA S1 Pro Sona कसे जिंकायचे

ओला स्टोअरला भेट द्या.

स्नूप, स्पॉट आणि ओलाची स्कूटर मोबाईलमध्ये शूट करा.

सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाका.स्पर्धेचा फॉर्म भरा आणि डिजिटल कार्ड स्क्रॅच करा.

टॅग्स :ओलाइलेक्ट्रिक कार / स्कूटरइलेक्ट्रिक कार