नवी दिल्ली : आजकाल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होताना दिसून होत आहे. अलीकडे, सॉफ्टवेअर कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने (HCL Technologies) जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची मोठी कपात केली होती. आता असे वृत्त आहे की, ओलाने (OLA) आपल्या सॉफ्टवेअर टीमच्या कर्मचाऱ्यांना गुलाबी स्लिप देण्यास सुरुवात केली आहे. कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीच्या विविध सॉफ्टवेअर वर्टिकलमधून किमान 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. यातील अनेक कर्मचारी असे आहेत, जे ओला अॅपच्या (OLA App) वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करत होते, असे म्हटले जात आहे.
रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या घसरत्या विक्रीनंतर कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ओलाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहन विभागाचा विस्तार करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. कंपनीने यापूर्वी प्री-ओन्ड कार बिझिनेस ओला कार्स आणि क्विक कॉमर्स बिझिनेस ओला डॅश बंद झाल्यामुळे जवळपास 2,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या सदस्यांसह 30 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत कंपनी सोडली आहे. या वर्षी जुलै महिन्यात ओला इलेक्ट्रिकचे चार्जिंग नेटवर्क हेड यशवंत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, 500 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याबाबत कंपनीने काहीही सांगितलेले नाही. ओलाच्या प्रवक्त्याने कर्मचारी कपातसंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे.
कंपनीने काय आहे लक्ष?कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिक, व्हीकल, सेल, बॅटरी, उत्पादन, ऑटोमेशन आणि ऑटोनॉमस इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी नॉन-सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डोमेनवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीत सध्या जवळपास दोन हजार इंजिनिअर आहेत. पुढील 18 महिन्यांत आपले इंजिनिअरिंग टॅलेंट पूल 5,000 पर्यंत वाढवण्याचे ओलाचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनी ऑपरेशन्सचे केंद्रीकरण करत आहे आणि अतिरिक्त संसाधने कमी करत आहे.
ओला स्कूटरच्या विक्रीत घटमार्च महिन्यात ओला S1 स्कूटरला आग लागली होती. यानंतरही ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या स्कूटरची मागणी घटली आहे. ओला स्कूटरच्या सॉफ्टवेअर आणि बॅटरीच्या परफॉर्मंसशी संबंधित ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. एप्रिलपासून ओला स्कूटरच्या विक्रीत घट झाली आहे. वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, ओलाने ऑगस्टमध्ये 3,351 वाहनांची विक्री केली, जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी आहे.