RBI Update On Rs 2000 Note : दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्वं बँकेकडून २००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. मध्यवर्ती बँकेनेही लोकांना या नोटा बँकेत परत करण्याची अनेकदा संधी दिली होती. आतापर्यंत २००० रुपयांच्या सुमारे ९७ टक्के नोटा आरबीआयकडे पोहोचल्या आहेत. मात्र लोकांनी अजूनही हजारो कोटी रुपयांच्या नोटांचा साठा करुन ठेवल्याचे समोर आलं आहे. आरबीआयने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
रिझर्वं बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २००० रुपयांच्या फक्त ६,८३९ कोटी रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या असून, ९८.०८ टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या १९ मे २०२३ च्या घोषणेनुसार, २००० रुपयांच्या नोटा यापुढे भारतीय बाजारपेठेत चलनात राहणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार असल्याचे रिझर्वं बँकेने म्हटलं आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या १९ इश्यू ऑफिसमध्ये या नोटा बदलण्याची सुविधा अजूनही उपलब्ध आहे. याशिवाय लोक पोस्ट ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटाही जमा करू शकतात. याशिवाय बँक नोटा स्वीकारणारी आरबीआयची १९ कार्यालये जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा वापरात आणण्यात आल्या होत्या.
2000 रुपये के नोटों का कुल मूल्य, जो 19 मई, 2023 को कारोबार बंद होने पर 3.56 लाख करोड़ रुपये था, जब 2000 रुपये के नोटों को वापस लेने की घोषणा की गई थी, 29 नवंबर, 2024 को कारोबार बंद होने पर घटकर 6839 करोड़ रुपये रह गया है। इस प्रकार, 19 मई, 2023 तक प्रचलन में रहे 2000 रुपये के… pic.twitter.com/z5m8LEj9Iq
— ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2024
दरम्यान, २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर असल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे. बँका आणि आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये लोक कोणत्याही अडचणीशिवाय त्यांची बदली करु शकतात. पोस्ट ऑफिसद्वारे नोटा जमा करण्याची सुविधा देखील सामान्य लोकांना, विशेषतः जे बँका किंवा आरबीआय कार्यालयात सहज पोहोचू शकत नाहीत त्यांना मोठा दिलासा आहे.