BTech Paani Puri Wali: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर B.Tech पाणीपुरीवाली म्हणून प्रसिद्ध असलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तापसी उपाध्याय हिला पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. विशेष म्हणजे, रस्त्यावर पाणीपुरी विकून तापसीने आता महिंद्रा Thar गाडी विकत घेतली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा काय म्हणाले? महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आणि ऑफ रोड वाहनाचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले की, याद्वारे लोक अशा कठीण ठिकाणी जाऊ शकतात, जिथे ते यापूर्वी जाऊ शकत नव्हते. यामुळे लोकांना अशक्य गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी मिळते. हे लोकांना त्यांची स्वप्ने जगण्यास मदत करते.
कशी आहे महिंद्र थार? गेल्या काही काळात महिंद्र थार खुप प्रसिद्ध झाली आहे. ही ऑफ रोड एसयूव्ही रिअर व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह, अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. याच्या रिअर व्हील ड्राइव्ह व्हर्जनला 1.5 लिटर डिझेल इंजिनची शक्ती मिळते, जे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. याशिवाय, 2.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनपर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. GNCAP कार क्रॅश चाचणीमध्ये याला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. थारची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपयांपासून सुरू होते.