नवी दिल्ली : भारतात सध्या सोन्यासोबतच चांदीची चमकही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. किंमत वाढल्याने लोकांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली आहे. सोने घेण्यापासून ते गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉण्डची मागणीही वाढली आहे. सध्या सोने आणि चांदी विक्रमी स्तरावर असताना गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ...
चांदीच्या किमती का वाढत आहेत?
nमहागाई कमी,
गुंतवणूकदार सकारात्मक.
nऔद्योगिक मागणी वाढल्याने किमती आणखी वाढतील.
nभविष्यात वाहन आणि ५जीसह अन्य दूरसंचार उद्योगात चांदीची मागणी वाढेल.
nऊर्जा संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सौर ऊर्जावर लक्ष केंद्रित करत आहेत. सोलर पॅनेल निर्मितीसाठी चांदीचा वापर होतो.
सोन्याच्या किमती का वाढल्या?
nअमेरिकेत व्याजदरात कपातीची शक्यता असल्याने सोन्याच्या किमतीत मोठी वाढ.
nजगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
nजागतिक अर्थव्यवस्थेत सुस्ती असल्याने मागणी वाढली.
nइस्रायल-हमास आणि रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य.