Join us

साेन्याला झळाळी; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी साेन्याने गाठला उच्चांकी दर, आणखी भाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:15 PM

काही दिवसांपूर्वीच साेन्याचे दर उच्चांकी पातळीच्या जवळ पाेहाेचले हाेते. यापूर्वी २०२० मध्ये साेने ५६,२०० रुपये प्रतिताेळा हाेते. 

नवी दिल्ली : गेल्या काही आठवड्यांपासून साेन्याच्या दरात वाढ हाेत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी साेन्याने उच्चांकी दर गाठला. इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असाेसिएशनच्या माहितीनुसार, साेन्याचा दर ५६,३३६ रुपये प्रतिताेळा एवढा झाला. दिवसअखेर ताे ५६,२५९ रुपयांवर आला. नव्या वर्षात साेन्याला चांगलीच झळाळी आली आहे. काही दिवसांपूर्वीच साेन्याचे दर उच्चांकी पातळीच्या जवळ पाेहाेचले हाेते. यापूर्वी २०२० मध्ये साेने ५६,२०० रुपये प्रतिताेळा हाेते. 

चांदीतही माेठी तेजी

साेन्यासाेबतच चांदीमध्येही तेजी दिसून आली. एक किलाे चांदीचा दर एक हजार १८६ रुपयांनी वाढून ६९,०७४ रुपये एवढा झाला. ६ जानेवारी राेजी हा दर ६७,८८८ रुपये हाेता.

२०२३ मध्ये  काय हाेणार?

जगात आर्थिक अनिश्चिततेचे सावट आहे. आरबीआयसह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी साेन्याचा साठा वाढविला आहे. त्यामुळे साेन्याच्या दरात तेजी राहणार असून, २०२३मध्ये ६४ हजार रुपये प्रतिताेळ्यापर्यंत जाऊ शकतात.

वर्षभरात दरांमध्ये माेठी वाढ 

साेने (१० ग्रॅम)    चांदी (१ किलाे)१ जानेवारी २०२२     ४८,२७९ रु.    ६२,०३५ रु.३१ डिसेंबर २०२२     ५४,८६७ रु.    ६८,०९२ रु.

टॅग्स :सोनंचांदी