Join us

Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:51 AM

Gold Rates Akshay Tritiya : शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीचे दर बजेट बाहेर गेल्याचे दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे आजचा भाव.

Gold Rates Akshay Tritiya : शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी सोन्या-चांदीचे दर बजेट बाहेर गेल्याचे दिसत आहेत. वायदा बाजारात सोन्याची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली. चांदीच्या दरानंही मोठी झेप घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय वायदा बाजारातही दिसून आला. सकाळी एमसीएक्सवर सोनं ४५० रुपयांनी वधारून ७२,०९५ च्या आसपास उघडलं. पण त्यानंतर त्यात ५०० रुपयांची वाढ झाली आणि ७२१४८ च्या आसपास व्यवहार करत होती. चांदीनंही ८५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचे दर ५०१ रुपयांच्या वाढीसह ८५००० रुपये प्रति किलो झाला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला तेजी 

अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात कपातीच्या वाढत्या अपेक्षेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरानं जोर धरला आहे. स्पॉट गोल्डचा भाव १.१४ टक्क्यांनी वधारून २,३३५ डॉलर प्रति औंस झाला. कॉमेक्सवरील सोन्याचा वायदा ०.८ टक्क्यांनी वधारून २,३४० डॉलर प्रति औंस झाला. 

सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर 

सराफा बाजारात गुरुवारी घसरण झाली असली तरी येथेही सोन्याचे दर ७२,२०० च्या पुढे गेले. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३८,४६० रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात सोन्याचा भाव ७२,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही १,५०० रुपयांनी घसरून ८३,२०० रुपये प्रति किलो झाला आणि त्यापूर्वीच्या सत्रात चांदी ८४, ७०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

टॅग्स :सोनंचांदी