नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर सेन्सेक्समध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं आज 10 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आज 1421 अंकांच्या तेजीनं बंद झाला. तर निफ्टीतही 421 अंकांची वाढ नोंदवली गेली आहे. BSE आणि NSEमध्ये जास्त करून शेअर्समध्ये तेजी नोंदवली गेली आहे. आज दिल्ली बिल्डकॉन आणि लक्ष्मी विलास बँकांच्या शेअर्सनही उसळी घेतली. अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.एसबीआय, इंडसइंड बँकेचे शेअर्स 8.5 टक्क्यांच्या तेजीनं बंद झाले आहेत. तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 7 टक्के तेजी दाखवण्यात आली आहे. इन्फोसिस आणि बजाज ऑटोशिवाय सेन्सेक्समध्ये 30 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकांचे शेअर्सही रेकॉर्ड ब्रेक करत उच्चांकावर पोहोचले आहेत. पीएसयू बँक इंडेक्स 7.9 टक्के राहिला आहे. तर मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
फिर एक बार मोदी 'प्रभाव', सेन्सेक्सनं केला 10 वर्षांतील रेकॉर्ड पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 5:21 PM