Success Story : जर मनात जिद्द असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर आपण नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. यश हे आपणहून मिळत नाही, त्यासाठी कठोर मेहनतही करावी लागते. आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेल्या अनेक लोकांच्या कहाण्या तुम्हा वाचल्या असतील. अशीच एक व्यक्ती म्हणजे विकेश शाह. विकेश शाहनं आता नाशिकमध्ये आपलं ९९ पॅनकेक्सचं आऊटलेट सुरू केलंय. क्विक रेस्तराँ व्यवसायात पॅन केक्स विकणारी देशातील पहिली कंपनी ९९ पॅनकेक्सनं काही दिवसांपूर्वी एफएमजीसी सेक्टरमध्ये एन्ट्री केली होती.
९९ पॅनकेक्स कॅफेमध्ये ग्राहकांना ₹१०० ते ₹ २००० च्या रेंजमध्ये कॉफीसह पॅनकेक्स, वॅफल्स, फ्राईज, पिझ्झा आणि केक इ. चाखण्याची संधी मिळू शकते. देशभरातील १५ शहरांमध्ये ९९ पॅनकेक्सची ४५ पेक्षा जास्त आउटलेट आधीच कार्यरत आहेत. ९९ पॅनकेक्सनं आता मध्य पूर्व देशांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यानं नाशिकमध्ये तर दुसरीकडे या वर्षी, प्रयागराजमध्येही त्यांनी आपलं आऊटलेट सुरू केलंय.
७०० रुपयांची कमाईअवघ्या १८ व्या वर्षी, विकेश शाहनं काही अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी मुंबईतील एका छोट्या केक शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या अनुभवाचं काहीतरी मोठं रूपांतर होईल याची कल्पनाही केली नव्हती. त्यानं त्या दुकानात अतिशय मेहनत केली. दरमहा ७०० रुपये कमावले आणि अवघ्या दोन वर्षांत तो मॅनेजरच्या पोस्टपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यानं नोकरी सोडली आणि स्वतःचे कॉर्पोरेट केटरिंग व्हेन्चर आणि खाद्यान्नाशी संबंधित दुसरा व्यवसाय सुरू केला.
सहा वर्षांपूर्वी नवा व्यवसायविकेश शाहनं २०१७ मध्ये ९९ पॅनकेक्स नावाची कंपनी सुरू केली. आज ९९ पॅनकेक्सच्या व्यवसायानं वार्षिक १५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. निराळ्या संकल्पनेवर सुरू झालेला हा व्यवसाय आहे. १९९९ मध्ये विकेश शाह एका बेकरीच्या दुकानात काम करत होता. मुंबईतील चर्चगेट येथील केक शॉपमध्ये नोकरी सुरू केली. आपल्याला जास्त अभ्यास करायचा नाही, घरच्या गरजेनुसार नोकरी करायची आहे हे विकेश शहाला माहीत होतं आणि यानंतर त्यानं कामासोबत कॉलेज शिकायचं ठरवलं.
अनेक चढ-उतारविकेश शाहनं आपलं पोट भरण्यासाठी अनेक छोटी-मोठी नोकरी केली. मुंबईच्या रस्त्यावर लायटर विकण्यासारखं कामही करावं लागलं. ५-६ महिन्यांनंतर, त्यानं पेस्ट्री आणि पॅनकेकचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल आपल्या जुन्या बॉसशी चर्चा केली. विशेष म्हणजे त्याच्याकडे पैसे नव्हते. किचनमध्ये असलेल्या भांड्यांचा वापर करून तू आपला व्यवसाय सुरू करू शकतोस आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा ते आपल्याला परत करू शकतोस असं त्याच्या जुन्या बॉसनं सांगत मदतीचा हात पुढे केला.