Lokmat Money > बिझनेस न्यूज > "९ वर्षांत केलेल्या कामांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसला," Aadhaar, UPI साठी ८ देशांशी करार

"९ वर्षांत केलेल्या कामांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसला," Aadhaar, UPI साठी ८ देशांशी करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीदरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 03:28 PM2023-09-06T15:28:01+5:302023-09-06T15:29:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीदरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

ondc will provide equal opportunities on digital platform will bring revolution Aadhaar UPI Digilocker contract with 8 countries pm narendra modi | "९ वर्षांत केलेल्या कामांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसला," Aadhaar, UPI साठी ८ देशांशी करार

"९ वर्षांत केलेल्या कामांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसला," Aadhaar, UPI साठी ८ देशांशी करार

गेल्या ९ वर्षांत सुरू झालेल्या कामांचा अर्थव्यवस्थेवर अनेक पटींनी परिणाम होत आहे. त्याच वेळी, भारताच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील क्रांतीचा आर्थिक प्रभावासह मोठा सामाजिक प्रभाव पडला असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

जी २० नं डीपीआय, सायबर सुरक्षा आणि डिजिटल कौशल्य यांसारख्या बाबींवर एकाच पेजवर पोहोचण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. जागतिक अर्थव्यवस्था, क्लायमेट अॅक्शन आणि डिजिटल तंत्रज्ञान यासह इतर गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी जागातील देशातून नेते भारतात येण्याच्या काही दिवस आधी सरकारने ही घोषणा केली. मनी कंट्रोलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

Aadhaar, UPI, Digilocker साठी करार
आधार, युपीआय, डिजिलॉकर (Aadhaar, UPI, Digilocker) आणि अन्य डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इंटिग्रेट आणि इनोव्हेट करण्याच्या मदतीसाठी भारतासोबत आठ देशांनी करार केला आहे. महागाईवर मात करण्यासाठी विविध देशांनी एकत्रितपणे कसं काम करणे आवश्यक आहे याबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. त्यांनी मोफत आणि आर्थिकदृष्ट्या बेजबाबदार धोरणांमुळे होणारं नुकसान आणि हवामान बदल हे जगासाठी कसे सामायिक वास्तव बनले आहे यावर देखील चर्चा केली.

समान संधी मिळणार
डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ONDC) विविध स्टेकहोल्डर्ससाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक समान संधी निर्माण करणार असल्याचं मोदी म्हणाले. “दीर्घकाळापासून भारत जगभरात आपल्या टेक टॅलेंटसाठी ओळखला जात होता. आज डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानातील प्रतीभा आणि तंत्रज्ञानातील कौशल्य या दोन्हींसाठी ओळखला जातो. ओएनडीसी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवेल आणि यामुळे निरनिराळ्या स्टेकहोल्डर्सना डिजिटल प्लॅटफॉर्मवर समान संधी मिळेल," असं ते म्हणाले.

इंटर-ऑपरेबल ई-कॉमर्स नेटवर्कद्वारे, सरकारला येत्या दोन वर्षांत देशातील ई-कॉमर्सचा व्याप्ती २५ टक्क्यांनी वाढण्याची आशा आहे. या नेटवर्कद्वारे ई-कॉमर्स ९० कोटी खरेदीदार आणि १२ लाख विक्रेत्यांपर्यंत पोहोचेल. यामुळे ४८ बिलियन डॉलर्सच्या एकूण व्यापारी मूल्याचं उत्पन्न होण्याची शक्यता आहे. 

Web Title: ondc will provide equal opportunities on digital platform will bring revolution Aadhaar UPI Digilocker contract with 8 countries pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.