मुंबई : शेअर बाजारात गेल्या तीन सत्रातील घसरणीला गुरुवारी ब्रेक लावत सेन्सेक्स आणि निफ्टीने जाेरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ४०५ तर निफ्टी १०९ अंकांनी वधारुन बंद झाले. तेजी परतल्यामुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सुमारे दीड लाख काेटी रुपयांनी श्रीमंत केले.
कच्च्या तेलाच्या दरातील घसरण, सेवा क्षेत्रातील वाढ तसेच आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. बँका, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
सेन्सेक्स : ६५,६३१.५७
निफ्टी : १९,५४५.७५