नवी दिल्ली : केरळला बसलेल्या महापुराच्या फटक्यामुळे देशातील एकपंचमांश (पाचवा हिस्सा) कॉफी उत्पादन धोक्यात आले आहे. केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कॉफी उत्पादक राज्य असून, त्यातून ४४ हजार लोकांना रोजगार मिळतो.
सूत्रांनी सांगितले की, देशात होणाºया एकूण कॉफी उत्पादनापैकी पाचवा हिस्सा उत्पादन केरळमध्ये होते. हे सारेच उत्पादन पावसामुळे बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. केरळमधील वायनाड, त्रावणकोर आणि निल्लियापथी या भागात कॉफीचे मळे आहेत. नेमका याच भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
कॉफी उत्पादनात कर्नाटक पहिल्या स्थानी आहे. एकूण उत्पादनापैकी ७० टक्के कॉफी उत्पादन कर्नाटकात होते. कर्नाटकातील बहुतांश कॉफी उत्पादन कोडागू विभागात होते. हा भागही पुराच्या तडाख्यात सापडला आहे. देशातील कॉफीच्या लागवडीखाली येणाºया एकूण क्षेत्रापैकी २५ टक्के क्षेत्र कोडागूमध्ये आहे. (वृत्तसंस्था)
देशाचे एक पंचमांश कॉफी उत्पादन धोक्यात
केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कॉफी उत्पादक राज्य असून, त्यातून ४४ हजार लोकांना रोजगार मिळतो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:09 AM2018-08-23T02:09:55+5:302018-08-23T02:10:10+5:30