Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

२०१८ मध्ये एका माय-लेकाच्या जोडीने माइटी मिलेट्स (Mighty Millets) ची सुरुवात केली. ज्याची वार्षिक उलाढाल आता ५० लाखांपर्यंत आहे. यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:17 PM2024-10-24T15:17:52+5:302024-10-24T15:27:38+5:30

२०१८ मध्ये एका माय-लेकाच्या जोडीने माइटी मिलेट्स (Mighty Millets) ची सुरुवात केली. ज्याची वार्षिक उलाढाल आता ५० लाखांपर्यंत आहे. यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

one idea mother and son started company mighty millets annual earning is 50 lakhs rupees | एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

गेल्या काही वर्षांत, भारतात अनेक स्टार्टअप्स सुरू होत आहेत, त्यापैकी काहींनी यश मिळवत दरवर्षी लाखो रुपये कमावले आहेत. अशाच एका स्टार्टअपबद्दल जाणून घेऊया... २०१८ मध्ये एका माय-लेकाच्या जोडीने माइटी मिलेट्स (Mighty Millets) ची सुरुवात केली. ज्याची वार्षिक उलाढाल आता ५० लाखांपर्यंत आहे. यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

कंपनी फूड प्रोडक्ट्स बनवते. ज्या अंतर्गत तब्बल ५० पेक्षा प्रोडक्ट आहेत. ही कंपनी सध्या भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये बाजरी कुकीज, शेवया, नूडल्स, पास्ता, पॅनकेक मिक्स आणि व्हेजिटेबल्स चिप्स यांसारखे प्रोडक्ट सप्लाय करते. ताज ग्रुप आणि जेडब्ल्यू मॅरियटसह ५० हून अधिक हॉटेल्स त्यांचे क्लाइंट असून ही कंपनी फूड सप्लाय करते.

कशी झाली कंपनीची सुरुवात?

सीए म्हणून काम करणारा साहिल जैन आणि त्यांची आई मीना यांनी २०१८ मध्ये हे स्टार्टअप सुरू केलं. साहिल जैनला स्वतःचं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे त्याने एके दिवशी ही नोकरी सोडली आणि आईसोबत पौष्टिक खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केली. आधी लाडू, व्हेजिटेबल्स चिप्स आणि बाजरीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली.

साहिलच्या आईला चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याची आवड आहे. एके दिवशी साहिलच्या मनात एक विचार आला की चविष्ट, पौष्टिक आणि अनोख्या खाद्यपदार्थाचा व्यवसाय का सुरू करू नये. मग त्याने आपल्या काही मित्रांना घरी जेवायला बोलवायला सुरुवात केली आणि त्याची आई वडापाव सारख्या पारंपारिक खाद्यापासून ते हैदराबादी टोस्टपर्यंत काही प्रादेशिक पदार्थ बनवायची. हा ट्रेंड अनेक आठवडे चालू राहिला, त्यानंतर त्याने Mighty Millets लाँच केलं.
 

Web Title: one idea mother and son started company mighty millets annual earning is 50 lakhs rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.