नवी दिल्ली : फेब्रुवारीत वस्तू व सेवा कराचे संकलन गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत ८.३ टक्क्यांनी वाढून १.०५ लाख कोटी रुपये झाले. जीएसटी संकलन सलग चौथ्या महिन्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक झाले. जानेवारी, २०२० मध्ये ते थोडेसे जास्त १.१ लाख कोटी होते.वित्त मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी दस्त अनुपालनातही सुधारणा झाली आहे. २० फेब्रुवारीच्या मुदतीआत दाखल जीएसटी विवरणपत्रांची संख्या १३.६ टक्क्यांनी वाढून ८३.५ लाख झाली. देशांतर्गत जीएसटी संकलनात १२ टक्क्यांची वाढ झाली. आयातीतील घसरणीमुळे एकात्मिक जीएसटीत मात्र ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. केंद्रीय जीएसटी १७ टक्क्यांनी वाढून २०,५६९ कोटी रुपये झाला. राज्य जीएसटी १३ टक्क्यांनी वाढून २७,३४८ कोटी झाला.मागील चार महिन्यांत ४.५५ लाख कोटींचे जीएसटी संकलनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षातील संकलन ३.२ लाख कोटीच होऊ शकले. हे वाढविण्यासाठी कर विभागाने डाटा विश्लेषणाचा आधार घेतला आहे.>ईशान्य भारतात वाढसरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ईशान्य भारतात जीएसटी यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे स्पष्ट होते. फेब्रुवारीमध्ये ७७ टक्क्यांच्या वाढीसह मणिपूर सर्वोच्च स्थानी आहे.
जीएसटीतून सलग चौथ्या महिन्यात एक लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 3:58 AM