नवी दिल्ली : केंद्र सरकार आगामी दोन वर्षांत राष्ट्रीय महामार्गांसाठी विशेष मोहीम राबवणार आहे. रस्ते क्षेत्रासाठी एका वर्षांत एक लाख कोटी रुपयांच्या कोषाची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते गुरुवारी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, ‘मी एका महिन्यात रस्ते विकासासाठी निलचित्र अर्थात ब्ल्यू प्रिंट तयार करणार आहे. एका वर्षांत एक लाख कोटी रुपयांच्या कोषाची व्यवस्था केली जाईल. याचा रिझल्ट दोन वर्षांत दिसेल.’
नव्या सरकारने रस्ते क्षेत्रावर बुधवारी श्वेतपत्रिका जारी केली. यात रस्त्यांच्या खराब स्थितीबद्दल यापूर्वीच्या सरकारच्या धोरणांना जबाबदार धरण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्पांचे वाटप भूमी अधिग्रहणाशिवाय केले होते. याचा या क्षेत्रावर खूप वाईट परिणाम झाला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयचे ६० टक्के प्रकल्प वादात अडकले आहेत, असे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.
नव्या सरकारने देशासमोरील समस्या जाणून घेतल्या आहेत, त्यामुळे नागरिकांसाठी चांगले दिवस येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महामार्ग प्रकल्पांच्या ठेकेदारांना त्यांची थकीत रक्कम महिनाभरात दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रस्त्यांसाठी एक लाख कोटींचा निधी
केंद्र सरकार आगामी दोन वर्षांत राष्ट्रीय महामार्गांसाठी विशेष मोहीम राबवणार आहे. रस्ते क्षेत्रासाठी एका वर्षांत एक लाख कोटी रुपयांच्या कोषाची तरतूद केली जाणार आहे,
By admin | Published: July 4, 2014 05:57 AM2014-07-04T05:57:14+5:302014-07-04T05:57:14+5:30